"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:58 IST2024-10-25T14:57:09+5:302024-10-25T14:58:40+5:30
लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमकीवर बोलताना, बिश्नोई हा खरा गांधीवादी आहे, बिश्नोई हा गांधींचे खरे काम करत आहेत, असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे.

"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
हरिद्वार येथून मुजफ्फरनगर येथे पोहोचलेल्या हिंदूवादी नेत्या साध्वी प्राची यांनी हृदय स्थान, शिव चौकात पोहोचून सर्वप्रथम शिवशंकरांची प्रार्थना केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमकीवर बोलताना, बिश्नोई हा खरा गांधीवादी आहे, बिश्नोई हा गांधींचे खरे काम करत आहेत, असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्राची सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या म्हणाल्या, "मी कोणत्याही गुन्हेगाराचे समर्थन करत नाही, पण बिश्नोई कट्टर गांधीवादी आहेत, कारण गांधीजींनीही निसर्गाची पूजा केली आणि बिश्नोई समाजही निसर्गाची पूजा करतो. ते जीवांचे रक्षण करत आहेत, गांधीजी देखील प्राण्यांवर प्रेम करत होते, हेदेखील त्यांच्यावर प्रेम करतात.
पुढे साध्वी प्राची म्हणाल्या, बुढाणामध्ये एक मोठी दुर्घटना घडणार होती. मात्र, मुझफ्फरनगर थोडक्यात बचावले. काही लोक मुझफ्फरनगरमध्ये दहशत माजवण्याचा कट रचत आहेत आणि हा पश्चिम उत्तर प्रदेश दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसला आहे. सरकारने याची दखल घेऊन गुप्तचर यंत्रणा कामाला लावावी आणि कठोर कारवाई करावी.