'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:15 IST2025-09-22T12:14:32+5:302025-09-22T12:15:12+5:30

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ विद्यापीठात आयोजित चौथ्या गोमती पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन केले.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath urges children to spend less time on smartphones, read more books | 'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला

'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ विद्यापीठात आयोजित चौथ्या गोमती पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांशी संवाद साधला आणि त्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवून दिले. शिवाय, त्यांनी शालेय विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांना पुस्तके भेट दिली. चांगली पुस्तके नेहमीच योग्य मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि आपल्याला भविष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात, असे योगी आदित्य नाथ म्हणाले.

भारतीय ऋषी आणि संतांचे उदाहरण देत मुख्यमंत्री म्हणाले की, याज्ञवल्क्यसारख्या ऋषींनी समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांनी ऋषी याज्ञवल्क्य आणि त्यांच्या पत्नी कात्यायनी आणि मैत्रेयी यांची कहाणी सांगितली आणि ज्ञानाचा शोध घेणे हे जीवनाचे ध्येय असले पाहिजे यावर भर दिला.त्यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांनी गोमती पुस्तक महोत्सवाची परंपरा सातत्याने पुढे नेली आहे. या वर्षीच्या महोत्सवात अडीचशेहून अधिक स्टॉल आहेत, जिथे बाललेखक आणि विविध भाषांमधील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके प्रदर्शित केली जातात आणि विकली जातात.

मुलांना 'एग्जाम वारियर्स पुस्तक भेट

योगी आदित्यनाथ यांनी मुलांना पंतप्रधानांनी लिहिलेले 'एग्जाम वारियर्स हे पुस्तक भेट दिले. ते म्हणाले की, मुलांनी पुस्तकातील सर्व मुद्यांचा अभ्यास केला तर कोणत्याही परीक्षेत किंवा स्पर्धेत त्यांना यश मिळवले सोपे होईल. 

व्हेन सिटिजन रीड्स, कन्ट्री लीड्स

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तक्षशिला विद्यापीठ, पाणिनी, सुश्रुत आणि ब्रह्मवेतांच्या कामगिरीचा उल्लेख करत भारतीय ज्ञान परंपरेवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केले की, तक्षशिला हे नाव भगवान रामाचा भाऊ भरताचा मुलगा तक्ष यांच्या नावावरून ठेवण्यात आले . ते म्हणाले की, वाचन आणि प्रगती ही भारतात एक परंपरा आहे.

अभ्यासासोबतच चांगली पुस्तकेही वाचावीत

मुख्यमंत्र्यांनी महर्षी वाल्मिकी आणि तुलसीदास यांच्या मूळ ग्रंथांचा उल्लेख करून सांगितले की, मौलिक ग्रंथ केवळ अमर होत नाहीत तर लेखकालाही अमर करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच चांगली पुस्तके अभ्यासण्याचे आवाहन केले.

मुलांना किमान एक पुस्तक खरेदी करण्याचे आवाहन

महिला निरोगी असतील तर समाज आणि राष्ट्र सक्षम होईल. त्यांनी लखनौमधील सर्व शाळांमधील मुलांना पुस्तक महोत्सवात उपस्थित राहण्याचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक पुस्तक खरेदी करावे याची खात्री करण्याचे आवाहन केले.

गोमती पुस्तक महोत्सव २० ते २८ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सुनीता शुक्ला, दीपमाला, कुसुम, पूनम पाल, विनीता पाठक, ज्ञानवती, तारावती यासारख्या अंगणवाडी सेविकांना विशेषतः पुस्तके वाटली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुस्तक प्रदर्शनात लावलेल्या विविध स्टॉल्सना भेट दिली. यावेळी मंत्री योगेंद्र उपाध्याय, सरकारी सल्लागार अवनीश अवस्थी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मनुका खन्ना, प्रसिद्ध लेखक, चित्रपट निर्माते आणि इतिहासकार चंद्र प्रकाश द्विवेदी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Uttar Pradesh CM Yogi Adityanath urges children to spend less time on smartphones, read more books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.