Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:30 IST2025-07-12T13:23:07+5:302025-07-12T13:30:04+5:30

BJP Leader Obscene Video: भाजप नेते राहुल वाल्मिकी हे बुलंदशहर जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत एका विवाहित महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Uttar Pradesh: BJP Leader Pleads After Getting Caught With Married Woman In Car At Cremation Ground In Bulandshahr; Video Viral | Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!

Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!

भाजप नेते राहुल वाल्मिकी हे बुलंदशहर जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत एका विवाहित महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना शिकारपूर कोतवाली परिसरात घडली. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणात राहुल वाल्मिकी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने विरोधकांकडून टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांना स्मशानभूमीजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा संशय आला. त्यानंतर गावकऱ्यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता राहुल वाल्मिकी एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत आढळले. ही महिला विवाहित असल्याचे सांगितले जात आहे.  

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राहुल वाल्मिकी गावकऱ्यांचे पायांना स्पर्श करून माफी मागत आहेत. तर, महिला ओढणीने स्वत:चा चेहरा लपवत असल्याचे दिसत आहे. पुढे राहुल वाल्मिकी मी तुमच्या पाया पडतो, असे बोलत असल्याचे ऐकू येत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही शिकारपूर पोलिसांनी कोणतीही कारवाई न झाल्याचे वृत्त आहे. या लाजिरवाण्या कृत्यानंतर राहुल लपवून बसल्याचे सांगितले आहे.

राहुल वाल्मिकी कोण आहे?
राहुल बाल्मिकी यांना भाजपच्या एससी मोर्चामध्ये संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्याकडे जिल्हा पातळीवर एक उदयोन्मुख चेहरा म्हणून पाहिले जात होते. पक्षाने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Web Title: Uttar Pradesh: BJP Leader Pleads After Getting Caught With Married Woman In Car At Cremation Ground In Bulandshahr; Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.