शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या सांगण्यावरुन बनवला 'टाईम बॉम्ब', आरोपी जावेदचे नेपाळ कनेक्शन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 22:07 IST

या घटनेमागचा सूत्रधार कोण, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सची पथके घेत आहेत.

Uttar Pradesh:उत्तर प्रदेश STF च्या पथकाने मुझफ्फरनगर जिल्ह्यातून जावेद नावाच्या व्यक्तीला टाइम बॉम्बसह अटक केली आहे. तो मूळ नेपाळचा असल्याची माहिती समोर आळी आहे. आता चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. एका महिलेच्या सांगण्यावरुन बॉटल टाईम बॉम्ब बनवल्याची माहिती जावेदने दिली आहे. 

महिलेलाही अटक यूपी एसटीएफ टीमने जावेदसह आणि एका महिलेलाही अटक केली आहे. इमराना असे त्या महिलेचे नाव आहे. त्या महिलेच्या सांगण्यावरुन जावेदने टाइमबॉम्ब तयार केला होता. तो बॉम्ब बनवण्याचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या ताब्यातून 4 टायमर बॉटल बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. यूपी एसटीएफने आरोपीकडून चार बॉम्ब, आयईडी, गन पावडर 999, लोखंडी गोळ्या, कापूस, पीओपी आदी साहित्य जप्त केले आहे. 

जावेदच्या माहितीनुसार, इमरानाने जावेदला बॉटल बॉम्ब तयार करण्यासाठी 10,000 रुपये अॅडव्हान्स दिले होते आणि बॉम्ब दिल्यानंतर उर्वरित 40,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. जावेदने काका मोहम्मद अर्शी याच्याकडून बॉम्ब बनवण्याची कला शिकल्याचेही समोर आले आहे. अर्शी मुझफ्फरनगरच्या मिमलाना रोडवरील कोतवाली नगर परिसरात राहतो. प्रत्यक्षात तो फटाके बनवण्याचे काम करतो.

दिल्लीपासून लखनौपर्यंत खळबळटायमर बॉटल बॉम्ब सापडल्याने दिल्ली ते लखनौपर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, पहिल्यांदाच पश्चिम यूपीमध्ये टायमर बॉटल बॉम्बचा कट उघड झाला आहे. यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, आणि कोण जावेदच्या नेटवर्कशी जोडलेले आहे, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सच्या पथक घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBombsस्फोटकेBlastस्फोटTerrorismदहशतवाद