देवबंदमध्ये 10 मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्मात केली घर वापसी! शुद्धीकरण यज्ञानंतर, धारण केली हिंदू नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:12 IST2025-04-04T16:10:52+5:302025-04-04T16:12:51+5:30
...यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्वामी यशवीर महाराज म्हणाले, भारतात राहणारे सर्व मुस्लीन आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांचे पूर्वज अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाल बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता त्यांनी अशा सर्व लोकांना सनातन धर्मात घरवापसी करण्याचे आवाहन केले आहे.

देवबंदमध्ये 10 मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्मात केली घर वापसी! शुद्धीकरण यज्ञानंतर, धारण केली हिंदू नावे
उत्तर प्रदेशातील देवबंद मधील बघरा येथील योग साधना यशवीर आश्रमात गुरुवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथील दहा मुस्लिमांनी इस्लाम सोडून सनातन धर्मातात घरवापसी केली. हे कुटुंब गुरुवारी सकाळी बघरा येथील स्वामी यशवीर जी यांच्या आश्रमात पोहोचले आणि स्वामी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर, आपण पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित केले. यज्ञानंतर त्यांनी हिंदू नावेही धारण केली. याच बरोबर आपण स्वतःच्या इच्छेने धर्म बदलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संबंधित कुटुंबाने म्हटले आहे की, आपल्या पूर्वजांच्या सनातन धर्मात परतण्याची इच्छा आहे. त्यांच्या पूर्वजांनी साधारणपणे चाळीस-पंन्नास वर्षांपूर्वी काही कारणास्तव सनातन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. आश्रमाचे मुख्य पुजारी स्वामी यशवीर महाराज आणि आचार्य मृगेंद्र ब्रह्मचारी यांनी वैदिक मंत्रांनी शुद्धीकरण यज्ञ केला. यावेळी संबंधित मुस्लीम कुटुंबाने भक्ती-भावाने तूप आणि साहित्य अर्पण केले यानंतर, सर्व दहा सदस्यांनी त्यांची मुस्लिम नावे सोडून हिंदू नावे धारण केली.
संबंधित कुटुंबातील प्रमुख राजकुमारी कश्यप आणि राजकुमाराव, त्यांचा मुलल बृजेश कश्यप यांनी घरवासीसंदर्भात आनंद व्यक्त केला आहे. यज्ञानंतर संबंधित सदस्यांवर पुष्प वर्षा करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्वामी यशवीर महाराज म्हणाले, भारतात राहणारे सर्व मुस्लीन आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांचे पूर्वज अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाल बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता त्यांनी अशा सर्व लोकांना सनातन धर्मात घरवापसी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आता देशात कसल्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नाही. सरकार चांगले काम करत आहे.