बाराव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता तरुण, रहिवाश्यांनी असे वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:25 IST2024-10-21T17:24:54+5:302024-10-21T17:25:08+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सेक्टर ७४ येथील सुपरटेक केपटाऊन हौसिंग सोयायटीमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने १२व्या मजल्यावरून खाली उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करत होता.

बाराव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता तरुण, रहिवाश्यांनी असे वाचवले प्राण
उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सेक्टर ७४ येथील सुपरटेक केपटाऊन हौसिंग सोयायटीमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने १२व्या मजल्यावरून खाली उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करत होता. हे चित्र पाहून आजूबाजूच्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. तसेच सोसायटीमध्ये गोंधळ उडाला. लोक आरडाओरडा करू लागले.
यादरम्यान, सोसायटीमधील काही रहिवाश्यांनी प्रसंगावधान दाखवत खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला मागून पकडले आणि सुरक्षितरीत्या बाजूला नेले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, सदर व्यक्तीने जीवन संपवण्याचा प्रयत्न का केला याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही.