विमानतळावर सुरक्षा रक्षकांना पाहून घाबरला, बॅग सोडून पळाला; ती उघडताच अधिकारीही चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:19 AM2023-12-10T10:19:56+5:302023-12-10T10:20:19+5:30

विभागाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

The passenger left the bag and fled after seeing the security forces at the airport | विमानतळावर सुरक्षा रक्षकांना पाहून घाबरला, बॅग सोडून पळाला; ती उघडताच अधिकारीही चक्रावले!

विमानतळावर सुरक्षा रक्षकांना पाहून घाबरला, बॅग सोडून पळाला; ती उघडताच अधिकारीही चक्रावले!

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मस्कतहून आलेल्या फ्लाइटमधील प्रवाशाने टर्मिनलवर आपली बॅग बसमध्ये टाकली. यानंतर सीआयएसएफ आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ती बॅग उघडून तपासण्यात आली. पिशवी सोन्याच्या पेस्टने भरलेली होती. त्या सोन्याची किंमत सुमारे ८७ लाख रुपये आहे. विभागाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे फ्लाइट WUY-261 मस्कतहून लखनऊ विमानतळावर पोहोचले होते. येथे प्रवाशांना टर्मिनल बसने विमानतळावर आणले जात होते. या काळात सीआयएसएफची कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. कडक तपासणी पाहून एक प्रवाशी घाबरला आणि त्याने आपली सोन्याची बॅग टर्मिनलवर बसमध्ये सोडून दिली.

सीआयएसएफ आणि कस्टम विभागाने ही बॅग पकडली

यानंतर कस्टम विभाग आणि सीआयएसएफने टर्मिनल बसमध्ये ठेवलेली बॅग पाहून तिची तपासणी केली असता त्यात सोन्याची पेस्ट सापडली, ज्याची किंमत ८७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कामगार विभागाकडून या प्रकरणाची माहिती मागविण्यात आली. यावेळी मस्कत येथून एक व्यक्ती आल्याची माहिती समोर आली, त्याने ही बॅग बसमध्ये टाकली.

पोलिसांनी सोने केले जप्त 

मस्कतहून येणारा प्रवासी विमानातून उतरल्यानंतर टर्मिनलवर बसमध्ये बसला होता, मात्र कडक तपासणीमुळे तो आपली बॅग बसमध्ये टाकून बसमधून खाली उतरला आणि गाडीत बसून निघून गेला. बॅग कोणीतरी सोडून गेल्याचे सीआयएसएफच्या लक्षात आले. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ती बेवारस बॅग उघडली असता त्यात सोने होते. पोलिसांनी सोने जप्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: The passenger left the bag and fled after seeing the security forces at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.