दुष्टांचा संहार करूनच राष्ट्र सुरक्षित राहू शकतं, योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 11:25 IST2025-09-06T11:25:30+5:302025-09-06T11:25:53+5:30
Yogi Adityanath News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्राच्या सुरक्षेबाबत एक मोठं विधान केलं आहे. देशातील नागरिकांचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार करूनच कुठलंही राष्ट्र सुरक्षित राहू शकतं. तसेच सुरक्षेच्या वातावरणामध्येच समृद्धीचं लक्ष्य प्राप्त करता येऊ शकतं, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दुष्टांचा संहार करूनच राष्ट्र सुरक्षित राहू शकतं, योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्राच्या सुरक्षेबाबत एक मोठं विधान केलं आहे. देशातील नागरिकांचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार करूनच कुठलंही राष्ट्र सुरक्षित राहू शकतं. तसेच सुरक्षेच्या वातावरणामध्येच समृद्धीचं लक्ष्य प्राप्त करता येऊ शकतं, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
महंत दिग्विजयनाथ यांच्या ५६ व्या आणि महंत अवैद्यनाथ यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी भारतासमोरील राष्ट्रीय सुरक्षेचं आव्हान या विषयावरील चर्चासत्राचं अध्यक्षपद भूषवताना योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांचं अभिनंदन करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, कुठलाही देश हा बाह्य रूपात सुरक्षित असेल आणि अंतर्गत रूपात सुरक्षित नसेल तर त्याला अराजक राष्ट्र मानलं जातं. असं अराजक निर्माण झालेलं राष्ट्र लवकरच समाप्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतं. पाकिस्तान हे अशाच प्रकारच्या अराजक राष्ट्राचं उदाहरण आहे. अंतर्गत अराजकाने ते पूर्णपणे खिळखिळं झालं आहे. अराजकता कुठल्याही देशाला दुर्गतीकडे घेऊन जाते. या दुर्गतीमुळे अस्तित्वावर संकट निर्माण होतं. भारत प्राचीन काळापासूनच याबाबत सजग आणि सतर्क राहिलेला आहे, असेही योगी यांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ यांनी पुढे सांगितले की, ही भूमी आपली माता आहे, असं शिक्षण भारतामध्ये वैदिक काळापासून दिलं गेलं आहे. कुठलाही सुयोग्य पुत्र आपल्या आईसोबत अराजक खपवून घेणार नाही. भारत मातेच्या मानसन्मानासोबत कुणी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात प्रत्येक भारतीय उभा राहील. रामायण काळात अशा उपद्रवींचा नाश करण्यासाठी श्रीरामांनी ‘निसिचर हीन करहुं महि…’ या संकल्पाला रामराज्याची आधारशिला बनवले. तर भगवान श्रीकृष्णाने ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ या मंत्राचा वापर केला होता असे सांगत योगी म्हणाले की, नागरिकांचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार हा राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अपरिहार्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दिलेल्या पंचप्रणांचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, यामध्ये लष्करातील जवानांप्रतिही सन्मानाची भावना जपण्याचा संकल्प आहे. आपले जवान उणे ५० डिग्री तापमानामध्येही देशाच्या सुरक्षेसाठी पाहारा देत जागे असताता त्यामुळए देशातील नागरिक हे शांतपणे झोपू शकतात. भारताचं लष्कर हे जगातील सर्वश्रेष्ठ सैन्यांपैकी एक आहे, ही बाब भारतीांसाठी अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत युद्धाची पद्धत बदललेली आहे. तसेच आपल्या सैन्याने शत्रूला त्याच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे, असेही योगी यांनी सांगितले.