शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सपा-काॅंग्रेसच्या साेशल इंजिनीअरिंगने वाढविले भाजपचे टेन्शन, उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या तीन टप्प्यात ४१ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:09 IST

इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे. 

राजेंद्र कुमार -

लखनाै : लाेकसभा निवडणुकीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या मतदारसंघांत मतदान हाेणार आहे. या टप्प्यात एकूण ४१ जागा आहेत. या जागांवर भाजप आणि ‘इंडिया’ आघाडीमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळेल. इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे. 

भाजपसाठी अखेरच्या टप्प्यात संघर्षभाजपचे नेते वाराणसी आणि लखनाैमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विजयाचा जसा दावा करीत आहेत, तसा दावा उर्वरित ३९ जागांवर करताना दिसत नाहीत. साेशल इंजीनिअरिंगमुळे ‘इंडिया’चे उमेदवार भाजपला आव्हान देत आहेत. 

इंडिया आघाडीचे साेशल इंजिनीअरिंगअखेरच्या तीन टप्प्यांत ४१ पैकी ३६ जागा अवध आणि पूर्वांचलच्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप व सहायाेगी पक्ष ‘अपना दल’ने ३६ जागांवर विजय मिळविला हाेता. आता त्या पुन्हा जिंकण्याचे या दाेन्ही पक्षांसमाेर आव्हान आहे. ज्या भागात ज्या समुदायाचे वर्चस्व आहे, तिथे त्या समुदायातील नेत्याला उमेदवारी दिली आहे.- १९ उमेदवार मागासवर्गीय - ११ उमेदवार ब्राह्मण व खुल्या प्रवर्गातील. - ८ उमेदवार कुर्मी समाजातील - ५ उमेदवार निषाद समुदायाचे - ४ उमेदवार पासी समाजाचे - प्रत्येकी एक उमेदवार यादव, पाल आणि मुस्लीम समुदायातील आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी