शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण : मुस्लीम पक्षाला HC चा धक्का, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:09 IST

आपल्याला तेथे पूजा करण्याचा अधिकारही मिळावा, अशी मागणीही हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती...

मथुरेतील भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.  याप्रकरणी हिंदू पक्षाने 18 याचिका दाखल केल्या होत्या. यात शाही ईदगाह मशिदीची जागा आपली (हिंदू) असल्याचे म्हणण्यात आले होते. एवढेच नाही तर, आपल्याला तेथे पूजा करण्याचा अधिकारही मिळावा, अशी मागणीही हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. 

यानंतर, मुस्लीम पक्षानेही प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, वक्फ अ‍ॅक्ट, लिमिटेशन अ‍ॅक्ट आणि स्पेसिफिक पझेशन रिलीफ अ‍ॅक्टचा हवाला देत हिंदू पक्षाच्या याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयानेमुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, आता अलाहाबाद उच्च न्यायालयात हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 18 याचिकांवर सुनावणी सुरू राहणार आहे. पुढची सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे.

हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार - न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे जाल्यास, अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची आदेश 7 नियम 11 ची आक्षेप घेणारी याचिका फेटाळली आहे. मुस्लीम पक्षाने हिंदू पक्षाच्या याचिकांना आव्हान दिले होते. अर्थात आता हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार आहे.

हिंदू पक्षाचा युक्तिवाद? -- ईदगाहचा संपूर्ण अडीच एकर परिसर भगवान श्रीकृष्ण विराजमानचे गर्भगृह आहे. - मस्जिद समितीकडे जमिनीची अशी कोणतीही नोंद नाही.- सीपीसीचा आदेश-7, नियम-11 या याचिकेत लागू होत नाही- मंदिर पाडून बेकायदेशीरपणे मशीद बांधण्यात आली आहे.- ही जमीन कटरा केशव देव यांच्या मालकीची आहे.- मालकी हक्क नसताना वक्फ बोर्डाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली आहे.- पुरातत्व खात्याने ही वास्तू संरक्षित म्हणूनही घोषित केली आहे. यामुळे यात उपासना स्थळ अधिनियम लागू होत नाही. - एएसआयने ही जमीन 'नझूल भूमी' मानली आहे, त्यामुळे ती वक्फची मालमत्ता म्हणता येणार नाही.

मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली - या जमिनीवर दोन्ही पक्षात 1968 मध्ये करार झाला होता. 60 वर्षांनंतर हा करार चुकीचा सांगणे योग्य नाही. यामुळे हा खटला चालण्यायोग्य नाही. याशिवाय, उपासना स्थळ कायदा अर्थात प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट 1991 प्रमाणेही हा खटला सुनावणी योग्य नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी धार्मिक स्थळाची ओळख आणि स्वरूप जसे होते तसेच राहील. अर्थात त्यात बदल करता येणार नाही. लिमिटेशन अ‍ॅक्ट आणि वक्फ कायद्यानुसारही याकडे बघितले जावे. या वादाची सुनावणी वक्फ ट्रिब्यूनलमध्ये व्हावी. हे दिवाणी न्यायालयात सुनावणीचे प्रकरण नाही, असा युक्तीवाद मुस्लीम पक्षाकडून न्यायालयात करण्यात आला.

 

टॅग्स :TempleमंदिरHinduहिंदूHigh Courtउच्च न्यायालयMuslimमुस्लीमUttar Pradeshउत्तर प्रदेश