शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:12 IST

समाजवादी पार्टीचे आमदार जाहिद बेग यांच्या अडचणी वाढल्या.

आपल्या घरात लहान मुलीचा मृतदेह आढळल्याने समाजवादी पार्टीचेआमदार जाहिद बेग यांच्या अडचणी वाढल्या. त्यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर त्यांनी सरेंडर केले. आमदार बेग यांच्यावर लहान मुलीकडून जबरदस्तीने काम करुन घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर परिस्थितीला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणी बुधवारी त्यांचा मुलगा जेम बेग याला मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मात्र तेव्हा आमदार जाहिद बेग आणि त्यांची पत्नी पोलिसांना सापडली नव्हती. मात्र, आता त्यांनी सरेंडर केले. त्यांनी भदोही येथील न्यायालयात हजेरी लावली. 

पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणी आमदाराच्या घरी हेल्पर म्हणून काम करायची आणि अनेक वर्षांपासून तिथे राहत असे. पण, घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक मीनाक्षी कात्यायन यांनी सांगितले की, आमदार बेग यांचा मुलगा जेम बेग याच्याविरुद्ध पुरावे सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

...अन् आमदाराच्या अडचणी वाढल्या

तसेच आमदार जाहिद बेग आणि त्यांची पत्नी सीमा बेग यांनी १७ वर्षांच्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावल्याचे त्यांच्या तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने ८ सप्टेंबरच्या रात्री आत्महत्या करुन जीवन संपवले. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ९ सप्टेंबरला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. आमदार आणि त्यांच्या पत्नीवर BNS च्या कलम १०८ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या चौकशीत आणखी एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या दोन वर्षांपासून आमदाराच्या घरी काम करत असल्याचे समोर आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMLAआमदारSamajwadi Partyसमाजवादी पार्टी