शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्ता खचला, खड्ड्यात कार अडकली; सत्ताधारी भाजपा विरोधकांच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 20:31 IST

पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. अशातच शहरातील विकास नगर परिसरात मध्यभागी रस्ता खचला अन् एकच खळबळ माजली. रस्ता खचल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून राजकारण देखील तापले असून समाजवादी पार्टीने सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला. खरं तर रस्ता खचल्याने एक कार त्यात अडकली. अथक प्रयत्नांनंतर संबंधित कार बाहेर काढण्यात यश आले. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली.

दरम्यान, लखनौमधील विकास नगर सेक्टर ४ मध्ये असलेल्या यदुवंश क्लिनिकजवळील मुख्य रस्ता अचानक खचल्याने २० फूट खोल आणि २० फूट रुंद खड्डा तयार झाला. खड्ड्यात कार अडकल्याने बघ्यांची गर्दी जमली. कसाबसा चालक गाडीतून बाहेर आला आणि त्याने विकासनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून रस्ता बंद केला.

पावसामुळे रस्ता खचला विकासनगरमधील सेक्टर ४ येथील यदुवंश क्लिनिकजवळील मुख्य रस्ता रविवारी दुपारी एक वाजता अचानक मोठा आवाज होऊन खचला. रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तेथून जात असलेले व्यापारी शशी भूषण नाथ मिश्रा यांची कार खड्ड्यात जाऊन अडकली. गाडीची मागील दोन्ही चाके खड्ड्यात अडकल्याने गाडी बाहेर निघत नव्हती. रस्ता खचल्याचा दाखला देत समाजवादी पार्टीने सरकारला लक्ष्य केले. 

'सपा'ने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, योगी सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गॅरंटी. लखनौच्या विकास नगरमध्ये हलक्या पावसामुळे रस्त्याच्या मधोमध अनेक फूट खोल खड्डा तयार झाला आहे. रस्त्यावरून जाणारी कार खड्ड्यात पडून थोडक्यात बचावली. भाजप केवळ विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करत आहे. जनता त्यांना आपल्या मतदानातून उत्तर देईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ