साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:06 PM2023-08-29T12:06:53+5:302023-08-29T12:07:26+5:30

वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून भाजपावर नाराज आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाजपाला घरचा आहेर देत असतात.

Sadhu's mobile phone rang! Varun Gandhi taunts Yogi adityanath, PM Modi, 'Don't stop, we don't know when he will become Chief Minister' | साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही'

साधूचा मोबाईल वाजला! वरुण गांधींनी योगींना टोला हाणला, 'रोखू नका, कधी मुख्यमंत्री होतील नेम नाही'

googlenewsNext

भाजपाचे फायरब्रँड खासदार वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरून जबरदस्त टोला हाणला आहे. वरुण गांधी हे त्यांच्या पीलीभीत मतदारसंघात भाषण देत होते, तेवढ्यात त्यांच्या बाजुला उभ्या असलेल्या एका साधू महाराजांचा फोन वाजला. तेव्हा वरुण यांच्या समर्थकांनी साधूला बोलण्यास सुरुवात केली. यावर वरुण यांनी अरे ओरडू नका, महाराज कधी मुख्यमंत्री बनतील सांगता येत नाही, असे म्हटले. 

वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून भाजपावर नाराज आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाजपाला घरचा आहेर देत असतात. नुकत्याच झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असल्यावरून टोला लगावला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर, जर हे साधू महाराज मुख्यमंत्री झाले तर आमचे काय होईल, काळाचा वेग समजून घ्या. महाराजजी, मला वाटतं आता चांगला काळ येणार आहे, असे म्हणत वरुण यांनी अच्छे दिनवरही टोला हाणला. 

जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा लोक मला विचारतात की पिलीभीत कसे आहे? पिलीभीतची ओळख माझ्यासोबत आहे. माझी ओळख पिलीभीतशी आहे. हा अतिशय पवित्र संगम आहे. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मी तुम्हाला मतदान करण्याची विनंती करतो. कोणासाठीही करा पण लांडग्यांची चाल खेळणाऱ्यांना करू नका, असेही वरुण म्हणाले. 

वरुण गांधी सातत्याने भाजपविरोधात आघाडी उघडत आहेत. सोशल मीडियापासून ते व्यासपीठावर ते सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. अशा विधानांवरून त्यांच्या आणि भाजपमधील अंतर दिसून येते. त्याचबरोबर त्याची आई मनेका गांधी यांनाही वरुणच्या बचावासाठी अनेकदा यावे लागले आहे. 

Web Title: Sadhu's mobile phone rang! Varun Gandhi taunts Yogi adityanath, PM Modi, 'Don't stop, we don't know when he will become Chief Minister'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.