शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गर्भवती वहिनीने दिरासोबत केलं लग्न, पती बनला वऱ्हाडी, नेमकं कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 23:05 IST

Marriage News: उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे विवाहाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गर्भवती वहिनीने तिच्या दिरासोबत सप्तपदी घेऊन विवाह केली. या अजब विवाह सोहळ्यात महिलेचा पती वऱ्हाडी बनला आणि त्याने या जोडप्याला आशीर्वादही दिले.

उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे विवाहाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गर्भवती वहिनीने तिच्या दिरासोबत सप्तपदी घेऊन विवाह केली. या अजब विवाह सोहळ्यात महिलेचा पती वऱ्हाडी बनला आणि त्याने या जोडप्याला आशीर्वादही दिले. या महिलेचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती या महिलेच्या पतीला समजल्यावर त्याने पत्नीला सोबत नांदवायला नकार दिला. तसेच तिच्या गर्भात वाढत असलेलं बाळही आपलं नसल्याचा दावा केला.

मिळालेल्या माहितीनुसार जौनपूरच्या बीबीपूर गावातील बहादूर गौतम याचा विवाह २६ मे २०२३ रोजी सरायख्वाजा क्षेत्रात राहणाऱ्या सीमा गौतम हिच्यासोबत झाला होता. दोघांचा विवाह कुटुंबीयांनी धुमधडाक्यात लावून दिला होता. लग्नानंतर सीमा सासरी गेली. तसेच नवदाम्पत्याचा संसार सुरू झाला.

मात्र काही दिवसांनंतर बहादूर गौतम याने सीमाचे संबंध त्याचा धाकटा भाऊ सुंदर गौतम याच्यासोबत असल्याची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली.  तेव्हा आई-वडिलांनी बहादूरची समजूत काढली, त्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र काही दिवसांत सीमा ही गर्भवती राहिली. त्यानंतर मात्र बहादूर याने सीमा हिला नांदवण्यास नकार दिला. सीमा हिच्या गर्भात वाढत असलेलं बाळ आपलं नसून आपला भाऊ सुंदर याचं असल्याचा दावा त्याने केला.

हळूहळू ही बाब गाववाल्यांच्या कानावर गेली.  त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने सीमा आणि सुंदर गौतम यांनी कोर्टामध्ये जाऊन लग्न  केलं. त्यानंतर गावातील मंदिरात येऊन सप्तपदी घेतली. यावेळी सीमाचा पती बहादूर हासुद्धा वऱ्हाडी बनला. तसेच त्याने या दाम्पत्याला आशीर्वादही दिले. आता या विवाहाची चर्चा पंचक्रोशीमध्ये होत आहे. 

टॅग्स :marriageलग्नFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश