"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:26 IST2025-10-28T14:23:36+5:302025-10-28T14:26:52+5:30
Yogi Adityanath : मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यातील आलेल्या व्यक्तींची भेट घेतली, त्यांच्या समस्या ऐकल्या.

"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीनंतर सोमवारी "जनता दर्शन" आयोजित केलं. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यातील आलेल्या व्यक्तींची भेट घेतली, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि नंतर अधिकाऱ्यांना दिलेल्या मुदतीत योग्य तोडगा काढण्याचं आणि लोकांना फीडबॅक देण्याचे निर्देश दिले. याच दरम्यान ५० हून अधिक व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या. लोकांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, "तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य आहे."
"पैशांअभावी कोणाचेही उपचार राहणार नाहीत अपूर्ण"
"जनता दर्शन" दरम्यान मुख्यमंत्र्यांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण झाल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. एका व्यक्तीने उपचारांसाठी आर्थिक मदत मागितली. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला एस्टीमेट तयार करण्याचे निर्देश दिले. पैशांअभावी कोणत्याही व्यक्तीचे उपचार अपूर्ण राहणार नाही असं त्यांनी सांगितलं. गरजू लोकांना उपचार देण्यासाठी सरकार तयार आहे.
"मी एक कलाकार आहे"
"जनता दर्शन" कार्यक्रमात एका महिला कलाकारानेही हजेरी लावली. तिने मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, ती एक लोककलाकार आहे आणि तिला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचा आहे. कृपया त्यासाठी व्यासपीठाची व्यवस्था करावी. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यासंबंधी आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, सरकार प्रत्येक जिल्ह्यात लोककलांना प्राधान्य देतं. सर्वत्र असंख्य कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळतील.
याच दरम्यान पोलिसांशी संबंधित बाबीही समोर आल्या. अनेक लोकांनी कौटुंबिक बाबींबाबत मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारी सांगितल्या. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांशी संबंधित तक्रारीकडे लक्ष देण्याचं आणि लोकांच्या समस्या लवकर सोडवण्याचे निर्देश दिले.