हृदयद्रावक! 5 मुलींनंतर मुलगा झाला पण रुग्णालयातून चोरीला गेला, हतबल आई म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:45 IST2023-08-16T17:44:31+5:302023-08-16T17:45:17+5:30

रुग्णालयातील महिला वॉर्डमधून आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना घडली.

newborn stolen from hospital mother crying son born after 5 daughters saharanpur | हृदयद्रावक! 5 मुलींनंतर मुलगा झाला पण रुग्णालयातून चोरीला गेला, हतबल आई म्हणते...

हृदयद्रावक! 5 मुलींनंतर मुलगा झाला पण रुग्णालयातून चोरीला गेला, हतबल आई म्हणते...

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील महिला वॉर्डमधून आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना घडली. ज्या महिलेचं बाळ चोरीला गेलं तिला आधीच 5 मुली आहेत. सध्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रुग्णालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेहत भागात राहणाऱ्या शहरीन नावाच्या महिलेला आधीच पाच मुली आहेत. 14 तारखेला पाच मुलींनंतर तिला मुलगा झाला. पण आज सकाळी हॉस्पिटलमधून तिचं बाळ कोणीतरी चोरून नेलं. हा प्रकार नातेवाईकांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रडून रडून आईची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
 
शहरीन सांगते की, ती पहाटे चार वाजेपर्यंत जागे होती. मुलगा तिच्या बाजुला झोपला होता.  तिला जाग आली तेव्हा मुलगा बेपत्ता असल्याचे तिच्या निदर्शनास आले. एक महिला अनेक दिवसांपासून रुग्णालयात फिरत होती, असे सांगण्यात येत आहे. तो शहरीनशीही बोलली होती. रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत असं सांगितलं. याच महिलेने शहरीनचे बाळ नेल्याची भीती व्यक्त होत आहे. सीसीटीव्हीत एक महिला मुलाला घेऊन जातानाही दिसत आहे.

सध्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. पोलीस आता रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेबाबत महिला रुग्णालयाच्या सीएमओ डॉ इंदिरा सिंह यांनी सांगितले की, सीसीटीव्हीमध्ये एक महिला मुलाला घेऊन जाताना दिसत आहे. आता त्या आधारे पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: newborn stolen from hospital mother crying son born after 5 daughters saharanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.