शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

video: लखनौ तिहेरी हत्याकांड; 70 वर्षीय कुख्यात आरोपी ताब्यात, NSA अंतर्गत होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 19:46 IST

आरोपीचे पाकिस्तान आणि नेपाळशीही संबंध, त्या अँगलनेही पोलीस करणार तपास.

Malihabad Triple Murder: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील मलिहाबादमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी लल्लन खान उर्फ ​​सिराज आणि त्याचा मुलगा फराज यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून 70 वर्षीय लल्लन आणि त्याचा मुलगा फराज याने 15 वर्षांच्या निष्पाप मुलासह तिघांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून दोघेही फरार होते.

घटनेनंतर होते फरारचौकशीदरम्यान लल्लनबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सिराजचे पाकिस्तान आणि नेपाळशीही संबंध समोर येत असून, त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेनंतर फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके त्यांचा माग काढत होती. दोघेही आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत होते, पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले.

याबाबत डीसीपी पश्चिम राहुल राज यांनी सांगितले की, घटनेनंतर 36 तासांत दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. आरोपीचे इथर दोन मुलगे पोलंडमध्ये असून त्यांचे नेपाळ कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे ते नेपाळमार्गे पोलंडला पळून जाण्याची भीती होती. लल्लन आणि फराज यांच्याबाबत लखनौ पोलिसांनी अलर्टही जारी केला होता.

आरोपींवर NSA दोघांची छायाचित्रे विमानतळावरील सर्व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती, जेणेकरून त्यांना विमानतळावर पकडता येईल. विमानतळासोबतच नेपाळ सीमेवरील एसएसबी आणि यूपीच्या सर्व जिल्ह्यांनाही अलर्ट केले होते. गुन्ह्यातून मिळवलेली त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. तसेच, दोन्ही आरोपींवर एनएसए लावण्यात येणार आहे. एवढा मोठा गुन्हेगार असतानाही लल्लन खानला त्याचा पासपोर्ट कसा मिळाला, याचाही तपास पोलीस करत आहेत. 

नेमकी काय घटना आहे?70 वर्षीय लल्लन खानने लखनौच्या मलिहाबादमध्ये शुक्रवारी संध्याकाळी जमिनीच्या ताब्यावरुन आपल्याच तीन नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो दिवसाढवळ्या गोळीबार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, लल्लन हा त्याच्या काळातील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 1980 मध्ये या परिसरात खानचे वर्चस्व होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिस