Ayodhya MP Avdhesh Prasad on Ram mandir flag hoisting अयोध्या: शतकानुशतके असलेले घाव व वेदना आता भरून निघाल्या आहेत. अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या ५०० वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाची पूर्तता झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. राममंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकविल्यानंतर मोदी यांनी हे वक्तव्य केले. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हा समारंभ आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी देशभरातील VIP मंडळींना निमंत्रण देण्यात आले होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे, अयोध्येचे विद्यमान खासदार सपाचे अवधेश कुमार यांना मात्र या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते. यावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रामललाच्या दरबारात धर्म ध्वजा फडकवण्यात आली. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसह राजकीय क्षेत्रातीलही अनेक लोक उपस्थित होते. पण अवधेश कुमार यांना या सोहळ्याला बोलवण्यात आले नाही. ते म्हणाले, रामललाच्या दरबारात झालेल्या सोहळ्याला मला आमंत्रित करण्यात आले नव्हते कारण मी दलित समाजाचा आहे. अशी विचारसरणी ही मर्यादा पुरूषोत्तम रामाची कधीच नव्हती. हा प्रकार म्हणजे इतर कुणाची तरी संकुचित मनोवृत्ती दाखवते. प्रभूश्रीराम सर्वांचे आहेत. माझा संघर्ष एखाद्या पदासाठी किंवा निमंत्रणासाठी नाही, मान-सन्मान आणि संविधानाच्या मर्यादा या संदर्भातील आहे.
दरम्यान, अवधेश प्रसाद हे समाजवादी पक्षाचे फैजाबाद (अयोध्या) लोकसभेचे खासदार आहेत. २०२४ मध्ये ते निवडून आले आणि सध्या तेथील विद्यमान खासदार आहे. ते सपाचे संस्थापक सदस्य, मिल्कीपूरचे नऊ वेळा आमदार आणि माजी उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री आहेत. दलित नेते असूनही ते एका बिगर राखीव जागेवरून जिंकले असे त्यांचे वैशिष्ट्य आहे. राम मंदिराच्या निर्माणानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाला पराभूत करून अवधेश कुमार विजय झाल्याने त्यांची बरीच चर्चा झाली होती.
Web Summary : Ayodhya MP Avdhesh Prasad, a Dalit leader, expressed disappointment at not being invited to the Ram Mandir event. He suggests his Dalit identity was the reason, contrasting it with Lord Ram's inclusive nature.
Web Summary : अयोध्या के सांसद अवधेश प्रसाद, एक दलित नेता, राम मंदिर कार्यक्रम में आमंत्रित न किए जाने से निराश हैं। उन्होंने सुझाव दिया कि उनकी दलित पहचान कारण थी, जो भगवान राम की समावेशी प्रकृति के विपरीत है।