शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2024 : "माझ्या वडिलांनी ३० वर्ष जे काही केलं...", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 16:22 IST

Kaiserganj Lok Sabha Result 2024 : भाजप उमेदवार करण भूषण सिंह आघाडीवर. 

Lok sabha Election Result 2024 : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ब्रिजभूषण यांना तिकीट देणे भाजपने टाळले. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. नामांकित महिला पैलवानांनी ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करताना सडकून टीका केली होती. ब्रिजभूषण शरण सिंह नाना कारणांनी चर्चेत असतात. नामांकित महिला पैलवानांनी केलेले गंभीर आरोप, आंदोलनं यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांचे चिरंजीव करण भूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज या जागेवरून चांगली आघाडी घेतली.

मतदानाची मोजणी प्रक्रिया सुरू असून करण यांनी पहिल्या कलांमध्ये मजबूत आघाडी घेतली. करण भूषण सिंह हे १ लाख ४२ हजार ३२७ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे उमेदवार भगत राम आहेत. 

करण भूषण सिंह म्हणाले की, मी कैसरगंज येथील जनतेचे आभार मानतो. माझ्या वडिलांनी मागील ३० वर्ष केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यांनी घेतलेले कष्ट यामुळेच मला हे यश मिळाले. 

अलीकडेच करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.  विशेष बाब म्हणजे अपघातानंतर, करण भूषण घटनास्थळी थांबले नाही. मात्र, पोलीस स्कॉर्ट असे लिहिलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील करनैलगंज कोतवाली भागातील करनैलगंज हुजूरपर मार्गावर करण भूषण यांचा ताफा हुजूरपूरच्या दिशेने जात होता. याच वेळी वैकुंठ महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाने चिरडले. मग वाद चिघळताच करण यांनी स्पष्टीकरण देत संबंधित मुले माझ्या वाहनापासून दूर असल्याचे सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा