सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही : मायावती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:48 IST2024-04-15T05:47:56+5:302024-04-15T05:48:50+5:30
सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती बोलत होत्या.

सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही : मायावती
सहारनपूर: जर या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर सध्याच्या एनडीए सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही, असा दावा बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी रविवारी केला आहे. सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यांची जातीयवादी, भांडवलशाही, संकुचित आणि द्वेषपूर्ण धोरणे, आणि त्यांच्या बोलण्यात व कृती करण्यात फरक आहे. या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर त्यांना केंद्रात सत्तेत परत येणे त्यांच्यासाठी सोपे नाही.
या निवडणुकांमध्ये त्यांची नाटकबाजी, घोषणाबाजी आणि गॅरंटी चालणार नाही. केवळ फसव्या घोषणा आणि वरवरची गॅरंटी यांच्या उलट त्यांनी जमिनीवर कोणतेही काम केलेले नाही हे देशातील जनतेला समजले आहे, असे त्या म्हणाल्या.