शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 18:32 IST

आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

artificial intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून याचाच प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. इथे दोन विद्यार्थ्यांनी एआयच्या मदतीने आपल्याच शाळेतील महिला शिक्षकाचे अश्लील फोटो बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शिक्षकांना धीर दिला. विद्यार्थ्यांच्या या कृत्यामुळे इतरही शिक्षक नैराश्याच्या छायेत आहेत. या प्रकरणी पीडित शिक्षिकेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिला शिक्षिकेचा आरोप आहे की, जेव्हा तिने या घटनेची तक्रार मुख्याध्यापकांकडे करायला सांगितली तेव्हा आरोपी विद्यार्थ्यांनी इतर शिक्षकांचे फोटो बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. 

खरे तर आरोपींनी महिला शिक्षिकेचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. महिला शिक्षिकेने सोशल मीडियावर तिचे अश्लील फोटो पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कृत्य करणारे विद्यार्थी नववीतील असल्याचे शिक्षिकेने तक्रारीत सांगितले आहे.  

नववीतील विद्यार्थ्यांचा कारनामा

पीडित शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही विद्यार्थ्यांनी एआयचा वापर करून महिला शिक्षिकेचे अनेक आक्षेपार्ह फोटो तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या घटनेची दखल घेत पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जे काही तथ्य समोर येईल त्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सTeacherशिक्षकPoliceपोलिस