शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अधुरी एक कहाणी! प्रियकराच्या लग्नात बेभान होऊन नाचली, मग चिठ्ठी लिहून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 18:41 IST

प्रेयसीने लग्नात डान्स करून मग टोकाचे पाऊल उचलले.

आपल्या डोळ्यादेखत प्रियकराचे होत असलेले लग्न पाहून संतापलेल्या तरूणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष बाब म्हणजे संबंधित प्रेयसीने लग्नात डान्स करून मग टोकाचे पाऊल उचलले. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली. सोमवारी प्रियकराच्या लग्नात प्रेयसीने जोरदार डान्स केला. यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी खोलीतून दोन पानी सुसाईड नोट जप्त केली आहे. यासोबतच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

कानपूर येथील साढ या गावातील शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली. राम नारायण यादव हे शेतकरी आहेत, त्यांची मुलगी संगीता महानगरपालिकेत कंत्राटी संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. ती तेथील जवळील कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरपूरम येथे भाड्याने राहत होती. ६ महिन्यांपासून ती इथे वास्तव्यास होती. मृत संगीता ज्या घरात राहायची त्या घराच्या मालकाने सांगितले की, संगीताने स्वतःला विवाहित असल्याचे सांगितले, तिच्यासोबत एक तरुणही राहत होता. तरुणाने स्वत:ला संगीताचा नवरा असल्याचे सांगितले. 

चिठ्ठी लिहून संपवलं जीवनमृत संगीताचा भाऊ अमित यादवने सांगितले की, संगीताचे विकास भवनातील कंत्राटी संगणक परिचालकासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते, पण तिच्या प्रियकराचे लग्न दुसरीकडेच ठरले होते, त्याचे लग्न सोमवारी झाले. या तरुणाने संगीताला लग्नाचे निमंत्रणही दिले होते. संगीताने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, आई आणि बाबा, मला माफ करा... मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. खोलीत जे काही ठेवले आहे ते घ्या.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू