आई, बहिणीकडूनच छळ आणि धमकी; उन्नाव पीडितेने केली पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 10:33 IST2023-10-22T10:32:53+5:302023-10-22T10:33:54+5:30
ज्या काकांसोबत पीडितेने सेंगर यांच्याविरोधात न्यायालयीन लढा जिंकला होता, त्याच काकांसह कुटुंबातील इतर सदस्यांनी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेली मदतीची रक्कम हडपल्याची तक्रार पीडितेने केली.

आई, बहिणीकडूनच छळ आणि धमकी; उन्नाव पीडितेने केली पोलिसांत तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क, उन्नाव (उत्तर प्रदेश) : उन्नाव जिल्ह्यातील तत्कालीन आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेने तिची आई, काका, बहिणीसह अनेकांविरुद्ध छळ, विश्वासघात आणि धमकावल्याची तक्रार दाखल केली आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून माखी पोलिस ठाण्यात तिचे काका महेश सिंह यांच्यासह आई, बहीण आणि अन्य एक महिला यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून तपासात जे तथ्य समोर येईल त्याआधारे कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
सध्या मी आठ महिन्यांची गरोदर असून तिच्या कुटुंबीयांच्या कटकारस्थानामुळे तिला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, असे तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मदतीचे पैसे हडपले
ज्या काकांसोबत पीडितेने सेंगर यांच्याविरोधात न्यायालयीन लढा जिंकला होता, त्याच काकांसह कुटुंबातील इतर सदस्यांनी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेली मदतीची रक्कम हडपल्याची तक्रार पीडितेने केली.