उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक भीषण अपघात झाला, ज्यात एका महिलेसह पाच जण जागीच दगावले. अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य समोर आले आहे. शनिवारी दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की संबंधित ऑटो रिक्षाचा पूर्ण चुरा झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रिक्षा दोन ट्रकमध्ये अडकल्याने घटनास्थळी आरडाओरडा झाला. ऑटो रिक्षात असलेल्यांना जीव वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. आग्रा येथील सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील गुरुद्वाराजवळ हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा सिकंदराकडे प्रवाशांना घेऊन जात होती. महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी या रिक्षाने एका ट्रकला ओव्हरटेक केला. रिक्षाच्या पुढेही एक ट्रक होता. समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने रिक्षा जागीच थांबली पण मागून येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ऑटोला चिरडले.
आग्रा : अंगावर काटा आणणारे दृश्य; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५ महिलेसह जण दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 18:10 IST