ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 05:10 PM2024-01-17T17:10:18+5:302024-01-17T17:11:51+5:30

Pran Pratishtha Security : अशी असेल पंतप्रधानांसाठीची सुरक्षा व्यवस्था...

Drone surveillance, more than 10 thousand CCTVs and 7 layers of security; Ayodhya became an impregnable fortress before Pranpratistha | ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या

ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या

राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या प्राण-प्रतिष्ठेपूर्वी अयोध्येला एखाद्या अभेद्य किल्ल्याचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उपस्थिती पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी जवळपास 8000 व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहे. आता ड्रोनच्या सहाय्याने येथील सिक्योरिटी मॉनिटरिंग होणार आहे. येथे 10 हजार हून अधिक सीसीटीव्ही इंस्टॉल करण्यात आले आहेत, जे जागो-जागी लक्ष ठेवतील. तर जाणून घेऊयात कशी असेल अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था...

सात लेअरची असेल सुरक्षा व्यवस्था - 
प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमावेळी अयोध्येत अचूक सुरक्षा व्यवस्था रहावी यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सुरक्षा संस्थांनी एकत्रितपणे 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. याच्या पहिल्या लेअरमध्ये SPG कमांडो असतील, ज्यांच्या जवळ आत्याधुनिक शस्त्रे असतील. दुसऱ्या घेऱ्यात NSG चे जवान असतील. तिसऱ्या घेऱ्यात IPS अधिकारी सुरक्षेची जबाबदारी पार पाडतील. चौथ्या घेऱ्याची जबाबदारी CRPF च्या जवानांवर असेल. पाचव्या घेऱ्यात उत्तरप्रदेश एटीएसचे कमांडर असतील. जे कुठल्याही संशयास्पद परिस्थितीत अॅक्शनसाठी तयार असतील. सहाव्या घेऱ्यात आयबी आणि सातव्या घेऱ्यात स्थानीक पोलिसांची फौज तैनात असेल.

अशी असेल पंतप्रधानांसाठीची सुरक्षा व्यवस्था - 
सर्वाधिक सुरक्षितता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुनिश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा घेऱ्यात तीन DIG, 17 SP, 40 ASP, 82 DSP आणि 90 इंस्पॅक्टर्ससह 1000 हून अधिक  कॉन्स्टेबल आणि 4 कंपनी पीएसी तैनात असतील. येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी 10 हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. ज्या लोकांच्या दुकानांसमोर आणि घरांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्यांनाही पोलीस कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहे.

अँटी ड्रोन सिस्टिमही इस्टॉल -
सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून, कार्यक्रमादरम्यान कुठल्याही हवाई हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी ड्रोनविरोधी यंत्रणांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजेंसने सुसज्ज अशा कमांड कंट्रोल सिस्टिम तयार करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एबीपी न्यूज सोबत बोलताना एसपी प्रवीण रंजन यांनी सांगितले की, राम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी सीआरपीएफच्या 6 कंपन्या, पीएसीच्या 3 कंपन्या, एसएसएफच्या 9 कंपन्या आणि एटीएस आणि एसटीएफची प्रत्येकी एक तुकडी 24 तास तैनात असेल.

स्नायपर्सदेखील तैनात -
याशिवाय, 300 पोलीस, 47 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 40 रेडिओ पोलीस कर्मचारी, 37 स्थानिक गुप्तचर, 2 बॉम्ब शोधक पथके आणि 2 अँटी सबोटाज पथके तैनात करण्यात आली आहेत. यांना केवळ कार्यक्रमाच्या ठिकाणीच नाही तर मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आणि चौकांवरही तैनात केले जाईल. जेणेकरुन कोणतीही घुसखोरी रोखता येईल. प्रत्येकावर नजर ठेवली जात आहे आणि संशयास्पद दिसणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे, असेही रंजन यांनी सांगितले. याशिवाय स्नायपर्सदेखील तैनात असणार आहेत.

Web Title: Drone surveillance, more than 10 thousand CCTVs and 7 layers of security; Ayodhya became an impregnable fortress before Pranpratistha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.