शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाला 'सीमा' नाही! प्रेमी युगुल एक महिना झाले बेपत्ता; अखेर घरच्यांची कबुली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 19:52 IST

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

प्रेम आंधळं असतं प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही, असं नेहमी बोललं जातं. पण याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील प्रेमी युगुलानं घरच्यांचा विरोध डावलून लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघे फरार देखील झाले मग पोलिसांच्या मध्यस्थीमुळं त्यांचं लग्न लागलं. संबंधित तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. मात्र, तोपर्यंत या दोघांनी राज्याची सीमा ओलांडली होती. अखेर हे प्रेमी युगुल गुजरातमध्ये सापडलं. 

दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांना माहिती देताच त्यांनी जवळच्या मंदिरात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. कानपूर येथील बैजू पुरवा या गावातील प्रवीण याचं जवळच्या गावातील तरूणीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी आपापल्या घरी याची माहिती दिली होती. पण, घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. 

अखेर घरच्यांची कबुली १० मार्च रोजी प्रवीण प्रेयसीला घेऊन गुजरातमधील अहमदाबाद इथं गेला. प्रेयसीच्या घरच्यांनी सगळीकडं तपास करूनही ती सापडली नसल्यानं पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला. एक महिन्यानंतर ८ एप्रिल रोजी पोलिसांना हे प्रेमी युगुल सापडलं. यानंतर दोघांशी चर्चा करून त्यांना समज देण्यात आली. मग पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. पोलिसांनी सांगितल्यानंतर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी लग्नास होकार दिला. यानंतर एका मंदिरात विवाहसोहळा पार पडला. खरं तर लग्नासाठी घरच्यांची कबुली मिळाली असली तरी यामुळं त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसmarriageलग्न