पटना - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला आहे. गेल्या महिनाभर बिहारमध्ये निवडणुकीमुळे आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यात बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत आहे. यात एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपा नेत्यांनी बिहारमध्ये सभा घेतल्या. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागील १० दिवसांत तब्बल ३१ रॅली आणि रोड शो काढून विरोधी काँग्रेस आणि आरजेडीवर घणाघात केला.
योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये १० दिवस प्रचार केला. त्यात त्यांनी ३० रॅली आणि एक रोड शो केला. योगी यांनी बिहारमध्ये एनडीएच्या ४३ उमेदवारांचा प्रचार केला. त्याशिवाय दरभंगा येथील एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी रोड शोही काढला. बिहारमध्ये एनडीएमधून भाजपा, जेडीयू, लोजपा, हम आणि राष्ट्रीय लोकमोर्चा एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. त्यात योगी आदित्यनाथ यांनी एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन जनतेला केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १६ ऑक्टोबरपासून बिहार निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली होती. एनडीएच्या प्रचारात सर्वात सक्रीय मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या स्टार प्रचारकांपैकी एक योगी आदित्यनाथ होते. बिहारवासियांना सर्वाधिक आकर्षित करणारे स्टार प्रचारक म्हणून ‘बुलडोझर बाबा’ दिसले, छतांवर, भिंतींवर, झाडांवर, बुलडोझरवर उभे राहून बिहारच्या लोकांनी योगी आदित्यनाथ यांचे स्वागत केले. उत्तर प्रदेशात गुन्हेगारीबाबत झीरो टॉरलेंस धोरणामुळे उमेदवारांकडून योगी आदित्यनाथ यांची मागणी वाढली. मुख्यमंत्री योगींनी उत्तर प्रदेश व बिहारातील सुशासनाची तुलना केली. सोबतच जंगलराज, गुन्हेगारी, भ्रष्टाचारावर काँग्रेस-राजद आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, महाआघाडीने भारताला सुवर्णयुग देणाऱ्या बिहारला कमकुवत राज्यात बदलले आहे. जगाला नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या बिहारला काँग्रेस आणि आरजेडी आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेत ढकलले आहे. या भूमीने माता जानकी, महात्मा बुद्ध आणि भगवान महावीरांना जन्म दिला. ही आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांची भूमी आहे, परंतु काँग्रेस आणि आरजेडीने या पवित्र भूमीला जातीभेद आणि माफियावादाने कलंकित केले आहे. जातीच्या आधारावर समाजाचे विभाजन केले, सरकारी तिजोरी लुटली आणि बिहारच्या तरुणांना बेरोजगार केले असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी लावला.
Web Summary : Yogi Adityanath conducted 31 rallies in Bihar over 10 days, campaigning for NDA candidates. He criticized Congress and RJD for corruption and misgovernance, contrasting it with Uttar Pradesh's improved law and order under his leadership. He urged voters to support NDA for development.
Web Summary : योगी आदित्यनाथ ने बिहार में 10 दिनों में 31 रैलियाँ कीं और एनडीए उम्मीदवारों के लिए प्रचार किया। उन्होंने कांग्रेस और राजद पर भ्रष्टाचार और कुशासन का आरोप लगाया, और उत्तर प्रदेश में अपनी सरकार के कानून और व्यवस्था की सराहना की। उन्होंने मतदाताओं से विकास के लिए एनडीए का समर्थन करने का आग्रह किया।