सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 04:33 PM2024-04-15T16:33:15+5:302024-04-15T16:35:32+5:30

खरे तर, अरुण गोविल हे संविधानावर बोलणारे भाजपचे पहिले नेते आहेत, असे नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांनी संविधानासंदर्भात भाष्य केले आहे.

Arun govil commented on Constitution Now opponents are attacking BJP | सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या पारश्वभूमीवर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघत आहे. काही दिवसांपूर्वीच, स्वतः बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी, ते देखील संविधान बदलू शकणार नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. यातच आता, भाजपचे मेरठमधील उमेदवार अरुण गोविल यांनी संविधान बदलण्यासंदर्भात भाष्य केले आहे. यानंतर, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धर भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. अनेक विरोधी पक्षनेते व्हिडिओ शेअर करून भाजपवर निशाणा साधत आहेत. खरे तर, अरुण गोविल हे संविधानावर बोलणारे भाजपचे पहिले नेते आहेत, असे नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांनी संविधानासंदर्भात भाष्य केले आहे.

काय म्हणाले अरून गोविल?
अरुण गोविल म्हणाले, आपल्या देशाच्या संविधानाची निर्मिती झाल्यानंतर, परिस्थिती आणि काळानुसार, त्यात हळू-हळू बदल झाले आहेत. 'बदल करणे हे प्रगतीचे लक्षण आहे. यात चूक काहीच नाही. कारण तेव्हा काही वेगळी परिस्थिती होती आणि आज काही वेगळी आहे. त्यानुसार आपल्याला काही बदल करायचा असेल... आणि संविधान कुण्या एका व्यक्तीच्या मनाने बदलता येत नाही.'

मोदीजी उगाच काही बोलत नाहीत... -
अरुण गोविल म्हणाले, सर्वसम्मती असेल तरच संविधानात बदल करता येतो. जर असे काही असेल तर केले जाईल. यावेळी एका पत्रकाराने विचारले की, पंतप्रधान 400 पार म्हणत आहेत. तर मोठं काही करायची सरकारची इच्छा आह? यावर गोविल म्हणाले, मला असे वाटते, कारण मोदीजी उगाचच काही बोलत नाहीत. त्यामागे काही ना काही अर्थ नक्कीच असतो.

अरुण गोविल यांचा व्हिडिओ समोर आल्यानतंर, आम आदमी पक्षाचे नेत संजय सिंह यांनी व्हिडिओ शेअर करत, 'देशाती 85%  दलित, मागास, वंचित आणि शोषित लोक हो, सावधान. भाजप संविधान बदलणार हे स्पष्ट आहे. आरक्षण संपेल. लल्लू सिंह, ज्योति मिर्धा, अनंत हेगडे यांच्यानतंर आता अरुण गोविल यांनीही संविधानावर भाष्य केले आहे. अरुण गोविल हे तर थेट मोदीजींचेच उमेदवार, असल्याचे बोलले जाते.' 

सपा अध्यक्ष अखिलेश यादव ट्विट करत म्हणाले, 'खरे तर, संविधान बदलून गरीब, वचित, शोषित, शेतकरी, तरून आणि महिलांचे अधिकर आणि आरक्षण संपवून, भांडवलदारांच्या हिताची धोरणे आणि योजना बनवून संपूर्ण नफा त्यांना देण्याची भाजपची इच्छा आहे. जे आपल्या अमाप नफ्यातील काही भाग निवडणूक देणगीच्या स्वरुपात भाजपला देतात.

 

Web Title: Arun govil commented on Constitution Now opponents are attacking BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.