शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 9:18 AM

Lok Sabha Election 2024 : कन्नौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा, विशेषतः यादव घराण्याचा बालेकिल्ला आहे.

कन्नौज : समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अखिलेश यादव गुरुवारी दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी समाजवादी पार्टीने अखिलेश यादव यांचा आपला पुतण्या तेज प्रताप यादव यांना या जागेवरून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, कन्नौजमधील समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि जागा गमावण्याची शक्यता पाहता अखिलेश यादव यांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

कन्नौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा, विशेषतः यादव घराण्याचा बालेकिल्ला आहे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सुब्रत पाठक यांनी डिंपल यादव यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. यावेळीही भाजपाने सुब्रत पाठक यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांचा सामना अखिलेश यादव यांच्याशी होणार आहे. भाजपाचे उमेदवार सुब्रत पाठकही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जाणकारांच्या मते, यंदाच्या लोकसभा निवडणकीत अखिलेश यादव आपल्या पारंपरिक जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच कुटुंबातील सदस्य असलेल्या पाच यादवांनाच तिकीट देण्यात आले आहे. समाजवादी पार्टीने अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरीतून, भाऊ धर्मेंद्र यादव यांना आझमगडमधून, शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादव यांना बदायूंमधून आणि रामगोपाल यादव यांचा मुलगा अक्षय यादल यांना फिरोजाबादमधून तिकीट दिले आहे.

सुब्रत पाठक यांच्याकडून खरपूस समाचार दरम्यान, सुब्रत पाठक यांनी कन्नौजमधून लढणाऱ्या अखिलेश यादव यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, अखिलेश यांचा घमंड तुटत आहे. कोणाशीही लढून जिंकण्याचा अखिलेश यादव यांचा घमंड आता तुटू लागला आहे. मी आधीच सांगत होतो की अखिलेश यांच्याशिवाय माझ्याविरुद्ध कोणीही लढू शकत नाही, जर तेज प्रताप लढले असते तर समाजवादी पार्टीचे ८० टक्के मतदार कार्यकर्ते माझेच झाले असते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४kannauj-pcकन्नौज