“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:12 IST2023-12-11T20:10:10+5:302023-12-11T20:12:55+5:30
Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली.

“२०२४ मध्ये भाजप जाणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले ते सांगावे”: अखिलेश यादव
Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला पराभूत करण्याचा विरोधकांनी चंग बांधला असून, इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत सामील असलेले विरोधी पक्ष आपापल्या भागात जोर लावताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना २०२४ मध्ये भाजप जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे.
सन २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले होते. आता २०२४ मध्ये भाजप सरकार जाणार आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. आजही जनतेचे प्रश्न तसेच आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, हे भाजपने सांगावे? सरकारचे म्हणणे आहे की ४० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. आता त्यांची स्थिती काय आहे? किती गुंतवणूक केली आहे? आम्ही ऐकले आहे की ज्या लोकांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती त्यांचा शोध अधिकारी घेत आहेत, असा खोचक टोला अखिलेश यादव यांनी लगावला.
आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बही बनवला नाही
बुंदेलखंडच्या या लोकांना हे समजले की, भाजपने मोठी स्वप्ने दाखवली आहेत. दिल्लीतील लोक आले आणि म्हणाले की, उत्तर प्रदेशात मिसाईल तयार केले जाईल. १० वर्षे मागे वळून पाहिले तर ज्यांनी टँक, बॉम्ब बनवण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बसुद्धा तयार केला नाही, या शब्दांत अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, सामाजिक न्यायाची लढाई केवळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हाच पूर्ण होईल. लोकांना हक्क मिळतील. हा लढा मोठा आहे. मागास आणि दलितांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. लोकांना सामाजिक न्यायाचा फायदा होईल. आम्ही फक्त पाल, बघेल आणि धनगर समुदायाच्या हितासाठी लढा देणार नाही, परंतु या संदर्भात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून लोकांना लोकसंख्येनुसार त्यांचे हक्क दिले जाऊ शकतात, असे अखिलेश यादव म्हणाले.