फतेहपूरमध्ये भीषण अपघात! दुधाचा टँकर-रिक्षामध्ये टक्कर, आठ ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 17:13 IST2023-05-16T17:12:24+5:302023-05-16T17:13:24+5:30
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातावेळी सात सीटर ऑटोमध्ये तेव्हा १४ लोक प्रवास करत होते.

फतेहपूरमध्ये भीषण अपघात! दुधाचा टँकर-रिक्षामध्ये टक्कर, आठ ठार, दोन जखमी
फतेहपूरमधून भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. यामध्ये दुधाचा टँकर एका ऑटो रिक्षावर जाऊन आदळला आहे. यात रिक्षातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात मंगळवारी हा अपघात झाला आहे. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. जहानाबादच्या चिल्ली मोड येथे हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठमोठ्याने आरडाओरडा सुरु झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातावेळी सात सीटर ऑटोमध्ये तेव्हा १४ लोक प्रवास करत होते. यामध्ये लहान मुले देखील होती. अपघात पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी एकाचवेळी आठ मृतदेह बाहेर काढल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली होती. अनेकांना धक्का बसला होता.