शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

UP : मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ३ तासांच्या छापेमारीत ९९ तरूण-तरूणींना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 16:09 IST

इतरही स्पा सेंटर्सची चौकशी करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लिंक रोड परिसरातील पॅसेफिक मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. ३ तास चालेल्या छापेमारीत ९९ जणांना पकडले आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली हे रॅकेट चालवले जायचे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बुधवारी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीनंतर तब्बल ९९ तरूण-तरूणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, ६९ तरूणी आणि ३९ तरूणांची पोलीस चौकशी करत आहेत. या स्पा सेंटरमधून काही आक्षेपार्ह वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पॅसिफिक मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पकडलेल्या ९९ जणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हे सर्व गाझियाबाद, नोएडासह दिल्ली-एनसीआर शहरातील रहिवासी आहेत.  

पोलिसांकडून अधिक तपास सुरू लक्षणीय बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्या मुलींपैकी काहींना जबरदस्ती हे काम करायला लावले जात असल्याचीही माहिती समोर येत आहे. हा व्यवसाय कधीपासून सुरू होता आणि त्याचा सूत्रधार कोण, याचा तपास पोलीस करत आहेत. इथे अश्लील व्हिडीओ बनवले जात होते का? याचाही पोलीस तपास घेत आहेत. आता पोलीस ताब्यात घेतलेल्या तरुण-तरुणींची चौकशी करत आहेत. लवकरच इतरही स्पा सेंटर्सची चौकशी करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस