तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उत्तर प्रदेश घडणार, योगी सरकारचा रोडमॅप तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:26 IST2025-09-12T17:26:27+5:302025-09-12T17:26:27+5:30

उत्तर प्रदेश Ai आणि डीप टेकचे जागतिक केंद्र बनणार

A new Uttar Pradesh will be created with the help of technology, Yogi government's roadmap ready | तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उत्तर प्रदेश घडणार, योगी सरकारचा रोडमॅप तयार

तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उत्तर प्रदेश घडणार, योगी सरकारचा रोडमॅप तयार

लखनौ: उत्तर प्रदेश पुढील 22 वर्षांत देश आणि जगासाठी एक टेक्नॉलॉजी पॉवरहाऊस म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे “विकसित यूपी @2047” हे स्वप्न म्हणजे राज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डीप टेक्नॉलॉजी आणि डिजिटल इनोव्हेशनचे जागतिक केंद्र बनविण्याचा रोडमॅप आहे. त्यांचा विश्वास आहे की, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेला नवीन उंची मिळेल, युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि उत्तर प्रदेश भारताच्या डिजिटल भविष्याचा मुख्य केंद्रबिंदू बनेल. योगी सरकारचे स्पष्ट मत आहे की, तंत्रज्ञान व नवोन्मेषाच्या बळावरच नवा उत्तर प्रदेश घडेल आणि तो आत्मनिर्भर व समृद्ध असेल.

गेल्या ८ वर्षांतला डिजिटल बदल

2017 पूर्वीची स्थिती निराशाजनक होती. 2015-16 मध्ये राज्यातील शाळांमध्ये संगणकाची उपलब्धता फक्त 13.3 टक्के होती. पण मागील साडेआठ वर्षांत या स्थितीत ऐतिहासिक बदल झाला. 2023-24 पर्यंत हा आकडा वाढून 40.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज 25,790 प्राथमिक शाळांमध्ये स्मार्ट क्लासेस, 880 ब्लॉक रिसोर्स सेंटरमध्ये ICT लॅब्स आणि शिक्षकांसाठी 2.61 लाखांहून अधिक टॅब्लेट्स उपलब्ध आहेत. स्वामी विवेकानंद युवा सशक्तिकरण योजनेअंतर्गत जवळपास 50 लाख युवकांना टॅब्लेट-स्मार्टफोन देण्यात आले आहेत, तर 2 कोटी युवकांना या योजनेचा लाभ देण्याचे लक्ष्य आहे. हे डिजिटल शिक्षण व कौशल्याधारित मनुष्यबळ घडविण्याचे मोठे पाऊल मानले जात आहे.

2030 पर्यंत डिजिटल उत्तर प्रदेश

मुख्यमंत्री योगींनी 2030 पर्यंत यूपीला टेक्नॉलॉजी हब बनविण्याचा रोडमॅप तयार केला आहे. लखनौ व कानपूरमध्ये उभारली जाणारी एआय सिटी राज्याला जागतिक संशोधन व नवकल्पनांचे केंद्र बनवेल. एनसीआर, लखनौ व नोएडा यांना ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs)चे प्रमुख केंद्र म्हणून विकसित केले जाईल. प्रत्येक विभागात इनोव्हेशन इन्क्युबेटर स्थापन केले जातील, ज्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. तसेच उत्तर प्रदेश सेमीकंडक्टर क्षेत्रात देशाचे अग्रगण्य केंद्र होण्यासाठी प्रयत्नशील आहे.

2047 पर्यंत डीप टेक्नॉलॉजीत जागतिक नेतृत्व

योगी आदित्यनाथ यांचे स्वप्न आहे की, 2047 पर्यंत यूपी डीप टेक्नॉलॉजीमध्ये जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करेल. यात AI, क्वांटम कम्प्युटिंग, ब्लॉकचेन, अॅडव्हान्स्ड रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, जीन एडिटिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी व ग्रीन टेक यांचा समावेश आहे. सरकारचे मत आहे की, या क्षेत्रात प्रावीण्य मिळविल्यास रोजगार, गुंतवणूक आणि डिजिटल क्रांतीचे केंद्र म्हणून यूपी उदयास येईल.

रणनीतिक स्तंभ आणि फोकस क्षेत्र
योगी सरकारने आपला विजन तीन स्तंभांवर आधारित केला आहे – एआय सिटी, ग्रीन आयटी व सस्टेनेबल टेक्नॉलॉजी आणि स्पेस टेक्नॉलॉजी. या स्तंभांना बळकट करण्यासाठी एआय व डीप टेक इनोव्हेशन, टियर-2 व टियर-3 शहरांमध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच सायबर सिक्युरिटी व डेटा प्रोटेक्शन हब निर्माण करण्यावर भर दिला जाईल. सरकारचे लक्ष्य आहे की 2030 पर्यंत सॉफ्टवेअर निर्यातीत पाचपट वाढ साध्य केली जावी.

6 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विश्वास आहे की एआय, डीप टेक्नॉलॉजी आणि उदयोन्मुख क्षेत्रे हीच 6 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरतील. विकसित यूपी @2047 अंतर्गत लखनौ व कानपूरमधील एआय सिटी, सेमीकंडक्टर व ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग हब, ग्लोबल डेटा सेंटर, इनोव्हेशन इन्क्युबेटर आणि सायबर सिक्युरिटी हब ही महत्वाची पावले राज्याला नवीन शिखरावर नेतील. एआय, क्वांटम कम्प्युटिंग, ब्लॉकचेन व ग्रीन टेक्नॉलॉजी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामुळे युवकांना जागतिक स्तरावरील कौशल्ये मिळतील आणि राज्याच्या जीडीपीला दरवर्षी 16 टक्के वाढ दर कायम ठेवण्याचे बळ मिळेल. हाच विजन 2047 पर्यंत यूपीला 6 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचा पाया ठरेल.

Web Title: A new Uttar Pradesh will be created with the help of technology, Yogi government's roadmap ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.