ठळक मुद्देमतदाराने मोबाईल केंद्रात नेऊन केला व्हिडीओ
कळंब : पदवीधर मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदानावेळी केंद्रात मोबाईल नेऊन मतदानाचा व्हिडिओ केल्याचा प्रकार कळंब येथे दुपारी समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी निर्देश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 72 केंद्रावरून मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर मोबाईल किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. असे असतानाही कळंब येथील मतदान केंद्रावर एका मतदाराने मोबाईल आत नेऊन मतदानाचा व्हिडीओ तयार केला. तरुणाने हा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल केला आहे. यानंतर या व्हायरल व्हिडीओची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकाराची दखल घेत तातडीने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे निर्देश कळंब येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Web Title: Legislative Assembly elections: Video of voting went viral, Usmanabad's Collector's action instructions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.