स्त्रीजातीचे तीन दिवसाचे अर्भक सोडून माता पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:35 AM2021-09-25T04:35:58+5:302021-09-25T04:35:58+5:30

उमरगा - दोन-तीन दिवसांच्या स्त्रीजातीच्या अर्भकाला ऑटोरिक्षामध्ये फेकून मातेने पोबारा केल्याची घटना उमरगा येथे उघडकीस आली आहे. या ...

The female passes the mother leaving the three-day-old infant | स्त्रीजातीचे तीन दिवसाचे अर्भक सोडून माता पसार

स्त्रीजातीचे तीन दिवसाचे अर्भक सोडून माता पसार

Next

उमरगा - दोन-तीन दिवसांच्या स्त्रीजातीच्या अर्भकाला ऑटोरिक्षामध्ये फेकून मातेने पोबारा केल्याची घटना उमरगा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ‘त्या’ मातेचा शोध घेत आहेत. पाच ते सहा महिन्यांतील ही चाैथी घटना आहे.

उमरगा शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बेडदुर्गे रुग्णालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या ऑटोरिक्षामध्ये (एमएच २५ / ई ९७४५) गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका महिलेने साधारणतः दोन दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्रीजातीचे अर्भक टाकून पोबारा केला. ऑटोरिक्षाचालक विनोद जाधव (रा. दक्षिण जेवळी, ता. लोहारा) यांची पत्नी बेडदुर्गे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी असल्याने तो रुग्णालयात होता. तो ऑटोरिक्षाजवळ आल्यानंतर अर्भक दिसून आले. याची माहिती जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस उपनिरीक्षक रमाकांत शिंदे, हवालदार बालाजी कामतकर, लक्ष्मण शिंदे घटनास्थळी तातडीने पोहोचले. तेथून त्या अर्भकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, सध्या या चिमुकलीवर उस्मानाबादच्या शासकीय स्त्री-रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: The female passes the mother leaving the three-day-old infant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app