शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

आता वेळ आहे , तर  ग्रेटाला भेटा, बघा ती मोठ्या माणसांवर का चिडली आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 07:00 IST

मोठ्या माणसांना रागावणारी ग्रेटा

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

तुम्ही ग्रेटा थनबर्गबद्दल ऐकलंच असेल. वर्षभरापूर्वी स्वीडनच्या संसदेबाहेर एकती हातात फलक घेऊन बसली होती. त्या फलकावर लिहिलं होतं - 'School Strike for climate  म्हणजेच, पर्यावरणासाठी शाळा बंद. त्यावेळी कुणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. एक छोटी मुलगी काहीतरी बोर्ड घेऊन बसली आहे इतकंच महत्व दिलं. तीही जिद्दी. दर शुक्रवारी नेटाने ती हा फलकबाजीचा उद्योग करायची. मग हळूहळू तिची ही शुक्रवारची ?क्टिव्हिटी व्हायरल झाली आणि ग्रेटाच्या निषेध संपात अनेक विद्यार्थी सामील व्हायला सुरुवात झाली. जगभर शेकडोंच्या संख्येने विद्यार्थीतिच्या  #FridaysforFuture मोहिमेत भाग घेतला. आजही घेतात. तिला असणारा पाठिंबा बघून संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेचं बोलावणं आलं. परिषदेत तिने दणक्यात भाषण तर केलंच पण जागतिक नेत्यांना चांगलं खडसावलं. म्हणाली,   ‘आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. पर्यावरणाबाबत जे घडतंय ते चुकीचं आहे. मी इथे असायला नको. मी शाळेत असायला हवं होतं. लोक मरतायत, त्यांना त्रस होतोय. सगळी पर्यावरण यंत्रणा नष्ट होतेय. आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आहोत. आणि तुम्ही पैसे,आर्थिक सुबत्तेच्या  गप्पा मारताय? पर्यावरणाकडे दुर्लक्ष करण्याची  तुमची हिम्मत कशी होते? तुम्ही माझी स्वप्नं विस्कटून टाकली आहेत. माझं बालपण हरवून गेलं आहे!’बापरे! चिमुरडी ग्रेटा पण तिने सगळ्या मोठ्या माणसांना चांगलंच फैलावर घेतलं. खूप ओरडली. मग मोठ्यांनीही तिचं ऐकायचं ठरवलं. तिचे खूप व्हिडीओज युट्युबला आहेत. तुम्ही ते बघू शकता. 

काय करा?1) युट्युबवर जा. 2) greta thunberg असं इंग्लिशमध्ये टाईप करा. तिची सगळी भाषण तुम्हाला बघायला मिळतील.