शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Unseasonal rains : शिरूर तालुक्यात गारपिटीचा तडाखा; ११९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २०४५ शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:42 IST

- कांदा, गहू, डाळिंबासह विविध पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे सुरू, तातडीने भरपाईची मागणी

शिरूर : शिरूर तालुक्यात १ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून तब्बल ११९५.८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे २०४५ शेतकरी संकटात सापडले असून तालुक्यातील १६ गावांना फटका बसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुवर्णा कटके-आदक यांनी दिली.

पूर्व व बेट भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा, बटाटा, गहू, मका, कलिंगड, डाळिंब, केळी, पपई, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे, तर काढणीला आलेला गहू व वादळामुळे अनेक ठिकाणी भुईसपाट झाला आहे. गारपिटीमुळे ऊसही आडवा पडला असून आंब्याच्या कैऱ्या व कच्चे डाळिंब गळून पडले आहेत.

कोळगाव डोळस, निर्वी, आंधळगाव, न्हावरे, गुणाट, चव्हाणवाडी, कोहकडेवाडी, शिंदोडी, नागरगाव, कुरूळी, पिंपरखेड, जांबूत, केंदूर, पाबळ, करंदी, खैरेनगर, कान्हूर मेसाई आदी गावांना या आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, सर्वाधिक नुकसान झालेल्या निर्वी परिसराची पाहणी माजी आमदार अशोक पवार यांनी केली. शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडे नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान मोठ्या प्रमाणात असून अंतिम पंचनाम्यानंतर आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rains Lash Shirur: Hailstorm Damages Crops, Farmers Affected

Web Summary : Unseasonal rains and hailstorms in Shirur taluka damaged 1195 hectares of crops, impacting 2045 farmers across 16 villages. Onion, wheat, and fruit crops suffered significant losses. Authorities are assessing the damage, and calls for immediate financial assistance are growing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRainपाऊस