शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

आय वूड लाईक टू मिट यु ऑल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 4:27 PM

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्दे तुम्हांला ही आवडतील न असे मित्र?  

यु इंडियन्स आर लव्हली , आय वूड लाईक टू मिट यु ऑल!’-  सेनेट उद्गारली. आणि मुलांनीही तिला प्रतिसाद दिला. आपल्याला अनेकदा पाश्चात्य देशांचे , तिथल्या राहणीमानाचे आकर्षण असते. पण बहुतांश पाश्चात्य देशांतील मुलांना भारत का आवडतो माहितीय का? तर बॉलीवूड मुळे. अर्जेन्टिना पासून व्हिएतनाम पयर्ंतच्या अनेक देशांतील शाळांतील मुलांना आमची मुले ,  तुम्हांला भारताबद्दल काय माहिती आहे? असा प्रश्न जेंव्हा विचारतात तेंव्हा बॉलीवूड चित्रपट हे उत्तर सर्वाधिक वेळा मिळाले आहे. त्यांना आपल्याकडचे चित्रपट आणि त्यातील कलाकार प्रचंड आवडतात, अनेकांना हिंदी चित्रपटातील गाणी पाठ असतात. आणि मग जेंव्हा अशी गाणी दोन्ही शाळेतील मुले म्हणू लागतात तेंव्हा मात्र एकच कल्ला होतो. 

त्यांना आपल्याकडील तिखट जेवणाविषयी फार उत्सुकता असते. एकदा तरी मी साडी नेसणार अशी इच्छा अनेक देशांतील मुलीनी आमच्या  ट्रीप दरम्यान व्यक्त केलेली आहे. किती भारी असत ना कि आपण, आपला देश कोणाला तरी आवडतो. आणि मग आपल्या देशाविषयी जास्त प्रेम असणाऱ्या मुला-मुलींशी आमची मुले मैत्री करतात. शाळेच्या बाहेर सुद्धा त्यांची मैत्री अबाधित आहे. हे विश्वची माङो घर याचा अनुभव मुले घेत आहेत. हीच मुले जगाचे भावी नागरिक आहेत, यांच्यातच जर एकमेकांविषयी बंधुत्वाचे नाते निर्माण झाले तर जागतिक ऐक्याच्या दृष्टीने ते चांगलेच आहे.रंग, भाषा, राहणीमान याहीपेक्षा एक माणूस म्हणून एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा  आदर करायला लागली आहेत. तुम्हांला ही आवडतील न असे मित्र?