तुम्हाला आता टेड टॉकबद्दल माहित झालंच असेल. कदाचित तुम्ही त्यांच्या साईटवर जाऊन आला असाल. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्कीच शोधली असतील. टेड टॉकच्या साईटवर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे, तुम्ही ऑनलाईन क्लब तयार करू शकता. सध्या तर शाळा बंद आहेत पण तुम्ही मित्र एकत्र येऊन ऑनलाईन क्लब तयार करू शकता. एखादा विषय घेऊन त्यावर काम करू शकता. या क्लबच्या माध्यमातून तुमच्या मनातल्या प्रश्नांना, तुमच्या कल्पनांना आकार देऊ शकता. त्यावर चर्चा करण्याची, या साइट्सही जोडलेल्या जगभरातल्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवू शकता. इतकंच नाही तर या क्लबच्या माध्यमातून तुम्ही जगभरातल्या अनेक क्लबच्या मुलांशी मैत्री करू शकता. तुमच्या आणि त्यांच्या कल्पनांची देवाणघेवाण करू शकता. लॉक डाऊनच्या या काळात जगभरातल्या मुलांशी कनेक्ट होऊ शकता.
तुम्हाला जगभरातल्या मुलांना भेटायचंय? - मग आजच "हा" क्लब जॉईन करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 07:35 IST
आज तुम्ही काहीतरी बघणारच,तर काय बघाल?
तुम्हाला जगभरातल्या मुलांना भेटायचंय? - मग आजच हा क्लब जॉईन करा!
ठळक मुद्देआताच्या काळात, जेव्हा आपल्याकडे वेळच वेळ आहे आपण याचा फायदा नक्की घेऊ शकतो.