शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या जुन्या प्रिय टीशर्ट्चा मेकओव्हर करायचा का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:17 IST

तुमची आई तो टी-शर्ट फरशी पुसायला घ्यायच्या आधी, काहीतरी करा. आजच करा!

ठळक मुद्देतुमचा टीशर्ट किंवा स्कर्ट एकदम नवीन होऊन जाईल..

आपल्याकडे काही कपडे असे असतात जे आपल्याला कधीच टाकून द्यायचे नसतात. म्हणजे कधीच नाही. म्हणजे मोठं झाल्यावर पण नाही. कारण ते कपडे इतके कम्फर्टेबल असतात, की त्यात अजिबात उकडत नाही. किंवा त्यातला एखादा टी शर्ट आपल्याला लकी असतो. किंवा एखादा स्कर्ट आपल्या लाडक्या मामा किंवा मावशीने पहिल्या पगारातून आणलेला असतो, आणि आपण ऑलरेडी दोन वेळा त्याची उंची वाढवलेली असते. पण आता तो स्कर्ट पूर्ण विटलेला असतो किंवा आपल्या टीशर्टचा पुढचा भाग भुरकट झालेला असतो.   ‘आता ते कपडे टाकून दे नाही तर मी फरशी पुसायला घेईन’ अशी धमकी आईने दोन वेळा देऊन झालेली असते. पण तरी आपल्याला ते कपडे टाकून द्यायचेच नसतात. अशा वेळी ते कपडे वाचवायचे कसे?तर रंगवून किंवा त्यावर पॅचवर्क करून!म्हणजे कसं? 

तर त्या टीशर्ट वर चक्क एखादं मस्त चित्र काढायचं. किंवा एखादं भारी वाक्य लिहायचं. आणि मग ते मस्त रंगवून टाकायचं. मस्त फ्रेश कलर्स घ्यायचे. किंवा रंगीत कलर्स घ्यायचे. जमलं तर पर्ल कलर्स किंवा स्पार्कल्स घ्यायचे. कपड्यावरचे रंग वेगळे मिळतात. पण ते ऑलमोस्ट सगळ्या मोठ्या स्टेशनरीच्या दुकानात मिळतात. आणि समजा रंग नसतील तर? तर एखाद्या दुस?्या जुन्या फ्रेश कापडातून आपल्याला पाहिजे ते आकार कापायचे, आणि त्याच्या कडा दुमडून ते शिवून टाकायचे. यात फुलं, हार्ट्स, चांदण्या, ढग असे आकार करणं त्यामानाने पुष्कळच सोपं असतं. आणि अशी सोपी सोपी चित्र एकमेकांना जोडून त्यातून एक छान चित्र बनवणं पण सोपं असतं. म्हणजे हार्ट्सचं झाड, किंवा चांदण्याचा पाऊस किंवा असं काहीही.. तुमचा टीशर्ट किंवा स्कर्ट एकदम नवीन होऊन जाईल..