शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आज उडायचं का आपण सुपरमॅनसारखं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:50 IST

हा एक फार म्हणजे फारच भारी व्यायाम आहे!

ठळक मुद्देबघा, हा व्यायाम करून. काही दिवसांनी तुम्हालाही एकदम सुपरमॅन झाल्यासारखं वाटेल!

सुपरमॅन पिक्चर, सिरीज, काटरुन यांपैकी तुम्ही काय पाहिलंय?काय भारी आहे ना? कसा हवेत उडतो. आपल्यालाही वाटतं, आपणही असंच हवेत उडावं. पिक्चर पाहता पाहताच आपण मग मनातल्या मनातच उडायला लागतो. या गावावरून त्या गावाला!आपल्याला आज खरंच उडायचं आहे. एकदम सुपरमॅनसारखंच.तुम्ही म्हणाल, काय शेंडय़ा लावतेय ऊर्जा तू.  बरं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगूनच टाकते. सुपरमॅनसारखं आपल्याला कसं उडायचंय ते!बरोबर. तुम्ही म्हणताय, तसं आपल्याला खरोखरच उडायचं नाहीय, तशी अॅक्शन आपल्याला करायचीय. पण आधीच सांगून ठेवते, निदान सुरुवातीला तरी फार भारी वगैरे वाटणार नाही, पण इतरांपेक्षा तुम्हाला चांगलं जमत असेल, तर मात्र खरंच फार मस्त वाटेल. कसं बनाल ‘सुपरमॅन’?

1- आधी पोटावर झोपा. तत्पूर्वी खाली काही तरी चादर नाहीतर सतरंजी टाका, म्हणजे तुम्हाला पोटाला टोचणार नाही.2- पोटावर झोपल्यावर हनुवटी जमिनीला टेकलेली.3- दोन्ही हातांचे तळवे सुरुवातीला जमिनीवर टेकलेले.4- पायांची बोटंही जमिनीला लागलेली.5- आता एकाच वेळी आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय उचला.6- थोडा वेळ, म्हणजे पाच सेकंद तसेच राहण्याचा प्रयत्न  करा. 7- हात आणि पाय, दोन्हीही फार वर नेण्याचा प्रयत्न करू नका. 8- पण लक्षात ठेवा, हा व्यायाम करत असताना श्वास एकदम बंद करून ठेऊ नका.असं दहा वेळा करा. नंतर जमायला लागल्यावर पंधरा किंवा वीस रिपिटेशन्सही तुम्हाला करता येतील. काय फायदा होईल?1- या व्यायामामुळे तुमच्या पाठीला मस्त ताण पडेल.2- ज्यांना पाठीचं दुखणं आहे, त्यांचं दुखणं कमी होईल किंवा ज्यांना नाहीच आहे काही दुखणं, त्यांना भविष्यात पाठीचा त्रस होण्याची शक्यता फारच कमी होईल.3- तुमची लवचिकता वाढेल.4-शरीराचा बॅलन्स साधायला मदत होईल.बघा, हा व्यायाम करून. काही दिवसांनी तुम्हालाही एकदम सुपरमॅन झाल्यासारखं वाटेल!- तुमचीच ‘सुपरमॅन’ मैत्रीण, ऊर्जा