अरे , कोण आवरणार तुझं कपाट ? फुटेल  ते :)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:54 PM2020-04-08T15:54:02+5:302020-04-08T15:57:01+5:30

इमानदारीत केलं, तर या कामात बोअर होण्यासारखं काही म्हणजे काहीसुद्धा नसतं!

DIY : messy cupboard , full of clothes, what to do? | अरे , कोण आवरणार तुझं कपाट ? फुटेल  ते :)

अरे , कोण आवरणार तुझं कपाट ? फुटेल  ते :)

Next
ठळक मुद्देसगळ्यात रटाळ काम कुठलं असं विचारलं तर निदान 90 टक्के मुलं सांगतील की आपलं कपाट आवरणे !

- गौरी पटवर्धन

काही कामांना ना काही ऑप्शनच नसतो. म्हणजे ती आपल्याला कितीही बोअर झाली, आपल्या दृष्टीने ती फालतू असली, आपल्याला असं वाटलं की यात नुसता वेळ जातोय तरी त्याने काहीही उपयोग होत नाही. काही कामं आईबाबांना फार फार महत्त्वाची वाटतात आणि त्यामुळे ती आपल्याला करावीच लागतात. खरं तर अशा कामांची यादी बरीच मोठी आहे; पण तरी त्यातलं सगळ्यात रटाळ काम कुठलं असं विचारलं तर निदान 90 टक्के मुलं सांगतील की आपलं कपाट आवरणे !

आपल्या कपाटात आपल्याला जे पाहिजे ते सगळं सापडत असताना आईवडिलांना ते कशासाठी आवरून पाहिजे असतं ते त्यांचं त्यांनाच माहीत ! पण म्हटलं ना, की काही कामं करावीच लागतात. मग जर का हे बोअर काम करायलाच लागणार असेल तर निदान असा विचार करूया की त्यात आपल्या फायद्याचं काही असू शकतं का?

जर का तुम्ही एकदा इमानदारीत कपाट आवरलं तर तुमच्या लक्षात येईल की हे काम वाटतं तितकं घाटय़ात जात नाही. त्यातून आपल्याही फायद्याच्या काही वस्तू सापडू शकतात. सगळ्यात आधी तर आपले हरवलेले कपडे सापडतात. कशावर तरी मॅचिंग सापडतं. एखादं पुन्हा फॅशनमध्ये आलेलं जॅकेट सापडतं, मित्रमैत्रिणींशी एक्स्चेंज करता येतील अशी कार्ड्स, स्टिकर्स सापडतात. वेगळी कानातली, गळ्यातली सापडतात. आणि सगळ्यात महत्त्वाच जुन्या वह्या सापडतात. त्यातल्या मागच्या पानांवर मित्रमैत्रिणींशी लिहून मारलेल्या गप्पा सापडतात. त्यामुळे कपाट लावा, अशा वह्या शोधा आणि त्याची शेवटची पानं नीट उचलून जपून ठेवा.
पुन्हा बाहेर पडाल तेव्हा त्या मित्रला / मैत्रिणीला दाखवता येतील.

Web Title: DIY : messy cupboard , full of clothes, what to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.