शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

12 वर्षा़च्या क्वाईनने बनवले डॉक्टर आणि पोलिसांसाठी हायटेक मास्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 16:56 IST

सारखा सारखा मास्क घालून डॉक्टर-पोलीसांना त्रास होऊ नये म्हणून, एका बारा वर्षाच्या मुलाने लढवली आयडिया!

ठळक मुद्देक्वाईनने बनवला इअर गार्ड

12 वर्षा़चा क्वाईन कॉलेण्डर कॅनडा मध्ये व्हॅनकोव्हर येथे राहातो. तो बॉइज स्काऊटमधला एक सदस्य आहे.  कोरोनाच्या काळात त्याच्या कानावर सतत एक गोष्ट पडत होती. ती म्हणजे मास्कच्या त्रास ची. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क. तासनतास असा मास्क वापरल्यानं डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा देणा:यांना प्रचंड त्रस होत असल्याच्या बातम्या क्वाईन रोज आजूबाजूला ऐकत होता, टीव्हीवर पाहात होता.  या मास्कचं इलॅस्टिक कानाच्या मागे घट्ट बसत असल्यानं  कानावर, डोक्यावर प्रचंड ताण येतो . कानाच्या मागे, चेहे:यावर  वळ उमटतात. तिथे खूप दुखतं. डॉक्टरांना, पोलीसांना - ज्यांना ज्यांना सतत मास्क वापरावा लागतो, त्या सगळ्यांना हा त्रास  फार होतो.- हा त्रास कमी कसा करता ये ईल, असा विचार करताना  क्वाईनला  ‘इअर गार्ड’ची कल्पना सूचली. प्लास्टिकचा इअर गार्डनं मास्क वापरणं सोप होऊ शकतं हे त्यानं जाणलं. मग त्यानं या इअर गार्डची डिझाइन बनवायला सुरूवात केली.  सुरूवातीला हे इअर गार्ड त्यानं आपल्या घरातल्या 3डी प्रिंण्टरवरच तयार केलं. हा इअर गार्ड बनवण्यासाठी त्यानं 3 डी प्रिण्टरसाठी वापरण्यात येणा:या पॉली लॅक्टिक अॅसिडचा वापर केला. प्लॅस्टिक स्ट्रीप असलेला हा इअर गार्ड डोक्याच्या मागे मास्कच्या दोन्ही बाजूच्या  इलास्टिकच्या मधोमध अडकवून तो कस्टम फिटींगच्या सहाय्यानं कमी जास्त करता येतो. या इअर गार्डच्या लूपमध्ये अडकवून मास्क कमी जास्त करता येतं. त्याचा फायदा म्हणजे एरवीच्या मास्कनं  कानामागे वळ उमटतात, तसे उमटत नाहीत.

क्वाईनचा हा इअर गार्ड डॉक्टरांना फार उपयोगी पडला. मग क्वीनकडे आजूबाजूच्या दवाखान्यातून या इअर गार्डची मागणी यायला लागली. क्वीननं स्वत: 1700 इअर गार्ड बनवले आणि ते आजूबाजूच्या दवाखान्यात वाटले. पण  या इअर गार्डची वाढती मागणी एकटा क्वाईन पूर्ण कशी करणार मग त्याच्या बॉइज स्काऊटनं त्याला या कामी मदत केली. त्या सर्वानी मिळून 5000   इअर गार्ड तयार केले तरीही इअर गार्डची मागणी वाढायलाच लागली. मग क्वाईननं इअर गार्ड स्ट्रीपचं डिझाईन फेसबुकवर टाकलं. आणि तिथून ज्यांना हवं त्यांना ते डाऊनलोड करता येईल याची सोय केली. क्वाईननं मार्चच्या शेवटी हा इअर गार्ड तयार केला. आणि ऑनलाइन डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली. तेव्हापासून आतार्पयत हजारो ऑनलाइन युजर्सनं क्वाईनचं हे डिझाईन डाऊनलोड केलं आहे.