World Tourism Day 2018 : महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यांना एकदा तरी भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:17 IST2018-09-27T15:15:35+5:302018-09-27T15:17:12+5:30
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या महाराष्ट्राचे वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे. याच कणखर सह्याद्रीच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

World Tourism Day 2018 : महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यांना एकदा तरी भेट द्या!
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या महाराष्ट्राचे वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे. याच कणखर सह्याद्रीच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सह्याद्रीच्या मातीत तयार झालेले राकट मावळे आणि सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये वसलेले किल्ले यांच्या साथीने महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडले. स्वराज्यात महाराजांनी आणलेला प्रत्येक किल्ला आजही महाराजांचा इतिहास जीवंत करतो. त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीनेही हे किल्ले महत्त्वाचे आहेत. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अशाच काही किल्ल्यांबाबत ज्यांनी स्वराज्य स्थापनेत मोलाचे योगदान दिले.
रायगड किल्ला -

कसे जाल - महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्या रायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे.
प्रतापगड -

कसे जाल - प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात असून पुण्यापासून 137 कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून बसेसची सोय आहे.
सिंहगड -

कसे जाल - पुणे शहराच्या अगदी जवळ हा किल्ला असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पुण्याहून जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.
मुरूड-जंजिरा

कसे जाल - रायगड जिल्ह्यातील हा जलदुर्ग अलिबागपासून सुमारे 45 कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे.
पन्हाळा गड -
कोल्हापूर जिल्ह्यात असलेला पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण किल्ला. महाराजांनी इ. स. १६५९ रोजी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज मोजक्या सहकार्यांबरोबर बाहेर पडून पन्हाळ्याहून सुखरूप विशाळगडावर पोहोचले होते.
कसे जाल - कोल्हापूर शहरापासून 20 कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. जवळच जोतिबाचे मंदिर म्हणजेच जोतिबाचा डोंगर आहे. कोल्हापूरहून काही प्रायवेट गाड्या आणि बसेसची सोय आहे.
शिवनेरी -

कसे जाल - शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून पुण्याहून 94 कि. मी. एवढ्या अंतरावर आहे.
सिंधूदुर्ग -

कसे जाल - किल्ल्यात जाण्यासाठी मालवणहून बोटीच्या साहाय्याने जाता येते.
विजयदुर्ग -

कसे जाल - विजयदुर्ग हे मुंबई पासून 485 किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून 455 किमी अंतरावर आहे. मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे
तोरणा -

कसे जाल - तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात आहे. पुण्यापासून वेल्ह्याला जाण्यासाठी बसेसची सोय आहे.
दौलताबादचा किल्ला

कसे जाल - औरंगाबादपासून फक्त १३ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. औरंगाबादपासून जाण्यासाठी अनेक गाड्यांची येथून सोय करण्यात आली आहे. जवळच अजिंठा-वेरुळच्या लेणी, घृष्णेश्र्वर मंदिर ही ठिकाणे आहेत.
