...म्हणूण अंतर्मुखी लोक असतात सर्वात चांगले ट्रॅव्हलर, 'हे' वाचून तुमचाही विश्वास बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 12:30 IST2019-04-30T12:15:48+5:302019-04-30T12:30:55+5:30
प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्त्व असतं. कुणी कमी बोलतं तर कुणी बोलून बोलून पार डोक्याचा भुगा करतं.

...म्हणूण अंतर्मुखी लोक असतात सर्वात चांगले ट्रॅव्हलर, 'हे' वाचून तुमचाही विश्वास बसेल!
(Source : treebo.com) (Image Credit : Bustle)
प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्त्व असतं. कुणी कमी बोलतं तर कुणी बोलून बोलून पार डोक्याचा भुगा करतं. आज आपण बघुया कमी बोलणाऱ्या व्यक्तींबाबत. कमी बोलणारे म्हणजेच अंतर्मुख लोक भलेही कमी बोलत असतील, पण कोणत्याही प्रवासाचा त्यांना अधिक फायदा होतो. म्हणजे असे लोक कुठेही गेलेत तर ते इतरांच्या तुलनेत अधिक अनुभव घेऊन येतात. असं का? याचं उत्तर खालील गोष्टींवरून जाणून घेता येईल.
१) वेळ
संकोची किंवा कमी बोलणारे लोक कोणत्याही ठिकाणाला समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देतात. ते पुस्तक वाचत वाचत किंवा म्युझिक ऐकत कोणत्याही ठिकाणावर फिरू शकतात. याचप्रकारे ते एखाद्या ठराविक ठिकाणाला पूर्ण देतात आणि ते त्या ठिकाणाबाबत इतरांपेक्षा अधिक माहिती घेऊन येतात.
२) आत्मनिर्भरता
Travelling करताना अनेक अनोळखी लोक भेटत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ स्वत:वर अवलंबून रहावं लागतं. त्यामुळेच म्हटलं जातं की, कमी बोलणारे लोक चांगले ट्रॅव्हलर असतात, कारण त्यांना दुसऱ्यांर अवलंबून राहणे पसंत नसतं.
३) बोलणं कमी ऐकणं जास्त
Introverts म्हणजेच कमी बोलणारे लोक हे ऐकतात जास्त. प्रवासादरम्यानही असे अनेक लोक भेटतात जे त्यांचे किस्से लोकांना ऐकवण्यासाठी आतुर असतात. अशात अंतर्मुखी लोक त्यांच्या गप्पा ऐकून त्यांचे मित्र होतात. त्यांच्याकडून खूर शिकतात. त्यामुळेच हे लोक अधिक क्रिएटीव्ह असतात असं मानलं जातं.
४) ज्ञान
प्रवासा करण्याचा अर्थ ज्ञान आणखी वाढवणे. या कामात कमी बोलणारे लोक अधिक चांगले असतात. हे लोक जिथेही जातात, तेथील कल्चरचं निरीक्षण करून आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. ते परिस्थितीच्या हिशेबाने स्वत:ला बदलतात. ते प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक बाजूचा विचार करणारे म्हणून ओळखले जातात.
५) सुट्टीचा पूर्ण आनंद
संकोची लोक केवळ फिरत नाही तर ते त्या ठिकाणाचा पूर्ण आनंद घेण्यात विश्वास ठेवतात. मग ते कुठे निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्याचा असो वा निसर्गाच्या विविधतेकडे बघण्याचा असो.
६) स्वत:ला आव्हान देणे
असे लोक जीवनाला फार जवळून जाणून घेण्यासाठी एकटेच एखाद्या प्रवासाला निघून जातात. त्यांना स्वत:ला आव्हान देणे पसंत असतं. स्वत:ला चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नसते.
७) दुसऱ्यांना देतात स्पेस
संकोची लोक दुसऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देतात. ते स्वत:च्या विचारांइतकंच महत्त्व दुसऱ्यांच्या विचारांना देतात. याप्रकारे ते ट्रॅव्हलिंग दरम्यान लोकांकडून एखाद्या जागेबाबत चांगल्याप्रकारे जाणून घेतात.
८) शांत राहणे
वेळेवर टॅक्सी न मिळाल्याने किंवा फ्लाइट मिस झाली असेल तर अशा स्थितीतही असे लोक शांत राहतात. अशाप्रकारे शांत राहूनच ते कोणत्याही अडचणीतून मार्ग शोधतात. प्रवासादरम्यान अशा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण हे लोक चांगल्याप्रकारे हॅन्डल करतात.