शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या रूममधून कोणत्या गोष्टी फ्री सोबत आणू शकता आणि कोणत्या नाही? नामुष्की टाळायची असेल तर नियम पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:44 IST

Complementary things in hotel room: हॉटेल रूमचे नियम काय असतात किंवा तिथून आपण सोबत काय आणू शकता किंवा काय नाही हे माहीत असणं फार गरजेचं आहे. जेणेकरून नामुष्कीचा सामना करावा लागणार नाही.

Complementary things in hotel room: कुठे फिरायला गेल्यावर जास्तीत जास्त लोक एखाद्या चांगल्या आणि परवडणाऱ्या हॉटेलमध्ये थांबतात. जेणेकरून फिरल्यानंतर येणारा थकवा दूर करता येईल. चांगल्या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. काही लोक तर हॉटेलच्या रूममधील काही वस्तूही चोरून आणतात. ज्यामुळे नाचक्की होते. हल्लीच बालीमधून एक अशीच घटना समोर आलीये. काही भारतीय लोक इथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेव्हा हे लोक हॉटेल सोडत होते, तेव्हा तेथील काही वस्तूही आपल्या बॅगमध्ये त्यांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्मचाऱ्यांना हे समजलं तेव्हा त्यांनी या लोकांना थांबवलं. 

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा रूममधील बऱ्याच गोष्टी गायब दिसल्या तेव्हा चेक-आउट करणाऱ्या भारतीय पर्यटकांना रोखण्यात आलं आणि त्याच्या बॅग चेक करण्यात आल्या. याचा व्हिडीओ सुद्धा बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यामुळे नक्कीच भारताची बदनामी झाली. आपल्याला वाचून धक्का बसेल की, या भारतीय पर्यटकांनी हॉटेलमधून पूल टॉवेल, बेडशीट, बाथ टॉवेल, डोरमॅट, किमोनो रोब, हेअर ड्रायर, भांडी, टीव्हीचा रिमोट देखील बॅगमध्ये घेतला होता. या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जास्तीत जास्त लोकांचं हेच मत पडलं की, भारतीय पर्यटकांचा हा कारनामा फारच वाईट आहे. अशाने देशाचं नावही खराब होतं. अशात हॉटेल रूमचे नियम काय असतात किंवा तिथून आपण सोबत काय आणू शकता किंवा काय नाही हे माहीत असणं फार गरजेचं आहे. जेणेकरून नामुष्कीचा सामना करावा लागणार नाही.

५ स्टार हॉटेलमध्ये आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात. पण यातील सगळ्यात गोष्टी आपण आपल्यासोबत आणू शकत नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये थांबताना तेथील काही नियम जाणून घ्या. सामान्यपणे हॉटेलमध्ये काही वस्तू पाहुण्यांना वापरण्यासाठी मोफत देतात. तर काही वस्तू हॉटेलची संपत्ती असतात. त्या सोबत घेऊन येणं चुकीचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पैसेही मोजावे लागू शकतात. 

मोफत काय दिलं जातं?

- हॉटेलच्या टॉयलेटमध्ये ठेवलेले छोटे पॅकेज जसे की, शाम्पू, कंडिशनर, बॉडी वॉश, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, शेव्हिंग किट आपण आपल्यासोबत नेऊ शकता.   

- स्लिपर्स म्हणजे रूममध्ये ठेवलेली चप्पल जी आपण वापरता, ती सोबत नेऊ शकता.  

- स्टेशनरी जसे की, पेन, नोटपॅड.   

- चहा-कॉफी सॅशे, शुगर, क्रीमरही आपण सोबत आणू शकता. 

- काही हॉटेलमध्ये छोटे शिलाई किट किंवा व्हॅनिटी किटही असतात. या गोष्टी मोफत असतात.   

या गोष्टी हॉटेल यासाठीही देतात, जेणेकरून त्यांचा वापर केल्यावर आपण हव्या असल्यास सोबत नेऊ शकता.

काय आणू शकत नाही?  

हॉटेलमधील टॉवेल, बाथरोब, बेडशीट, ब्लँकेट, उशी, पिलो कव्हर, हेअर ड्रायर, किटली, प्रेस, टीव्ही रिमोट, ग्लास, कप, प्लेट्स, कॉफी मेकर मशीन, हॉट वॉटर जग, डेकोरेशन साहित्य, मिनीबारमधील वस्तू या गोष्टी आपण हॉटेल सोडताना आपल्यासोबत आणू शकत नाही. या वस्तूंसाठी हॉटेलकडून पैसे घेतले जाऊ शकतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hotel Room Etiquette: What's Free to Take, What's Not?

Web Summary : Know hotel room rules to avoid embarrassment. Toiletries, slippers, stationery, tea, and coffee are complimentary. Towels, bedding, electronics, and kitchenware are not. Taking hotel property can lead to charges and public shaming, as seen in a recent incident involving Indian tourists.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सhotelहॉटेल