(Image Credit : TripSavvy)
चेन्नईपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे महाबलीपुरम. सागरी किनाऱ्यावर असलेलं हे प्राचीन मंदिर त्याकाळातील इंजिनियरिंगचा उत्तम नमूना आहे. येथे असणारं मंदिर आणि स्थळांचे अवशेष त्याकाळातील भव्यतेचं दर्शन घडवतात. महबलीपुरमची स्थापना पल्लव राजांद्वारे करण्यात आली होती. जाणून घेऊयात या ठिकाणाची वैशिष्ट्य...
महाबलीपुरम हे ठिकाण मल्लापुरम या नावानेही ओळखलं जातं. येथे असलेले पंच रथ पल्लव वंशाच्या राजांच्या वीरगाथेची ग्वाही देत आहेत. या रथांची प्रतिमा मोठ्या मोठ्या दगडांना पैलू देऊन साकारण्यात आली आहे. येथे असलेली मंदिरं आणि गुहा इसवीसन 600 ते 700 शतकामध्ये साकारण्यात आली आहेत.
इतिहासकारांच्या मते, प्राचीन काळामध्ये पुरूष वर्गामध्ये आपली शारीरिक शक्ती राखण्याचा प्रभाव होता. त्यामुळे त्याकाळातील लोक मल्ल युद्ध किंवा कुस्ती यांसारख्या शारीरिक बल दाखवणाऱ्या खेळांना प्राथमिकता देत असतं. असं फक्त सैनिक किंवा सामान्य लोकांमध्ये होत नसे तर राजांमध्येही अशा स्पर्धा खेळवण्यात येत असतं. अशाच स्पर्धांमध्ये विजयी झाल्यानंतर आपला विजय साजरा करण्यासाठी आणि त्या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी त्याकाळातील राजे मंदिर आणि गुहा तयार करत असत. त्यामुळेच महाबलीपुरममध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिरं, धार्मिक स्थळं आणि कलात्मक गुहा पाहायला मिळतात.
महाबलीपुरममध्ये ग्रेनाइटच्या दगडांना पैलू पाडून भव्य आणि जीवंत प्रतिमा तयार केल्या जात असत. आजही त्या ठिकाणी त्यावेळच्या काही प्रतिमा पाहायला मिळतात. हे ठिकाण भारतीय इतिहासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण येथे प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहता येतात.
वास्तूकला घडवणाऱ्या हातांना कदाचित हे ठाऊक होतं की, भविष्यामध्ये कदाचितच अशा वास्तूकला पाहायला मिळतील. त्यामुळेच त्यावेळच्या लोकांनी मोठ्या मोठ्या दगडांना पैलू देऊन रथ, मंदिर, मठ, आरमगाह यांसारख्या वास्तू घडवल्या. या संरचनांच्या बाहेरील आणि आंतरिक भाग तयार करण्यासाठी लहान डोंगरांनाही अत्यंत कल्पकतेने पैलू देण्यात आले. आज इतक्या वर्षांनीही या वास्तू अगदी जीवंत वाटतात.
लोकेशन्सही आहेत सुंदर
या ठिकाणी जास्त वर्दळ नसते. तसेच येथून काही दूर अंतरावर समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांचा आनंद घेता येतो. तसेच दुसऱ्या बाजूला सुंदर कलाकृती आहेत. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे.
कसे पोहोचाल?
देशातील कोणत्याही महानगरातून तुम्ही प्लेन, बस किंवा ट्रेनच्या माध्यमातून चेन्नई अथवा तमिळनाडूपर्यंत पोहचू शकता. त्यानंतर येथून महाबलीपुरम येथे जाण्यासाठी प्रायवेट टॅक्सी करू शकता.