शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:53 IST

Indian Railway Ticket Fare Increase News: शताब्दी, तेजस, वंदे भारत आणि गतिमान या सर्व ट्रेन चेअर कार स्वरुपातील आहे.

Indian Railway Ticket Fare Increase News: भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, सुविधांसाठी आणि सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारचे बदल करत असते. काही बदलांचे प्रवाशांकडून स्वागत केले जाते. तर काही बदलांमुळे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत असतात. डिसेंबर २०२५ मध्ये भारतीय रेल्वेने तिकीट दरांमध्ये वाढ केली. यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. यातच भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि गतिमान एक्स्प्रेस या प्रिमियम ट्रेन आहेत. रेल्वेने तिकीट दरात वाढ केल्यानंतर यापैकी कोणत्या ट्रेनचे तिकीट तुलनेने स्वस्त आहे, ते जाणून घेऊया...

प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळावा यासाठी भारतीय रेल्वे देशभरात विविध ट्रेन चालवते. मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि प्रीमियम ट्रेनचा यात समावेश आहे. सध्या, प्रीमियम श्रेणीमध्ये राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. २६ डिसेंबर २०२५ पासून भारतीय रेल्वेने सुधारित भाडे रचना लागू केली आहे. यानुसार, नॉन-एसी कोचमध्ये ५०० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १० रुपये जास्त द्यावे लागतील. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये नॉन-एसी कोचसाठी प्रति किलोमीटर २ पैसे भाडे वाढवले ​​आहे, तर एसी क्लासच्या भाड्यातही प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

शताब्दी, तेजस, वंदे भारत आणि गतिमान या सर्व ट्रेन चेअर कार स्वरुपातील आहे. यामध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास येतात. अलीकडच्या दर वाढीनंतर एसी चेअर कारमध्ये १-५० किमी प्रवासासाठी मूळ तिकिटाची किंमत शताब्दी एक्सप्रेससाठी ₹१७४, तेजस एक्सप्रेससाठी ₹२०८, वंदे भारतसाठी ₹२४३ आणि गतिमान एक्सप्रेससाठी ₹२५१ आहे.

एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये त्याच अंतरासाठी शताब्दीवर ₹३८८, तेजसवर ₹४६५, वंदे भारतवर ₹५०४ आणि गतिमानवर ₹५६२ हे मूळ भाडे आहे. या चार ट्रेनपैकी, शताब्दी एक्सप्रेसचे तिकीट सर्वात स्वस्त आहे. तथापि, आराम आणि सुविधांच्या बाबतीत, वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणे श्रेयस्कर आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat, Tejas, Shatabdi: Which train is cheapest after fare hike?

Web Summary : After recent fare hikes, the Shatabdi Express is the most economical among premium trains. However, Vande Bharat offers superior comfort and facilities.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सticketतिकिट