शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

युनिक फील देणारी अभयारण्यं

By admin | Updated: April 7, 2017 19:12 IST

हिरवीगार झाडं, वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, सकाळी उठताना पक्षांचा किलबिलाट आणि हवीहवीशी वाटणारी शांतता.हे मनातलं चित्रं फक्त नॅशनल पार्क किंवा अभयारण्यच पूर्ण करू शकतं.

- अमृता कदम

वाहनांची गर्दी, कर्कश हॉर्न आणि गोंगाट, आकाशाला भिडणाऱ्या इमारती आणि त्यातून मधूनच डोकावणारे हिरवे पट्टे. आपल्या रोजच्या आयुष्यात आजूबाजूला हेच चित्र दिसतं. आणि मग कधीतरी या सगळ्यातून निसटून निसर्गाच्या खूप जवळ जावंस वाटतं. हिरवीगार झाडं, वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, सकाळी उठताना पक्षांची किलबिल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हवीहवीशी वाटणारी शांतता. नॅशनल पार्क किंवा अभयारण्यं आपल्या कल्पनेतलं हे चित्र मूर्त करु शकतात. जैवविविधतेनं नटलेल्या भारतात जवळपास शंभर राष्ट्रीय उद्यानं, 40 व्याघ्र प्रकल्प आणि 450 हून अधिक अभयारण्यं आहेत. त्यातही काही ठराविक अभयारण्यं किंवा नॅशनल पार्क आहेत, जी तिथे आढळणाऱ्या ठराविक प्राण्यांमुळे पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणी चार ते पाच दिवसांची एक सुंदर ट्रीप नक्कीच प्लॅन करता येऊ शकते.

1.कान्हा नॅशनल पार्क- रूडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’मागची प्रेरणा असलेलं हे जंगल. साहजिकच मोगलीच्या या जंगलातलं मुख्य आकर्षण शेर खान असणार. मध्य प्रदेशामध्ये वसलेलं हे नॅशनल पार्क 1940 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात वसलेलं आहे. साग आणि बांबूच्या वनराईमध्ये काळवीट, चिंकारा, चौसिंगा. नीलगाय, अस्वल, कोल्हे, बिबटे असे अनेकविध प्राणी पहायला मिळतात. कान्हाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बारसिांंगाचं इथे मोठ्या कष्टानं संवर्धन केलं गेलंय. कान्हामधला सनसेट पॉइंट ही एक महत्त्वाची जागा. सूर्यास्ताच्या पाशर््वभूमीवर कुरणांवर चितळं, सांबर, हरणांना चरताना पाहणं हा आनंदाचा भाग असतो.कान्हाला जाण्यासाठीचा सर्वांत योग्य काळ म्हणजे मार्च ते मे. पार्क पर्यटकांसाठी आॅक्टोबर ते जून या कालावधीतही सुरु असतं. पण पानगळ आणि उन्हामुळे जनावरांचं पाणवठ्यावर येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पर्यटकांना अधिकाधिक प्राणी पाहता येतात.

2. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क- 1936 साली सुरु झालेलं हे भारतातलं पहिलं नॅशनल पार्क. वाघांच्या संरक्षणासाठी सुरु झालेल्या प्रोजेक्ट टायगरचाही शुभारंभही इथूनच झाला. त्यामुळे अर्थातच इथे येणाऱ्या पर्यटकांना उत्सुकता असते ती वाघ पाहण्याची. पण त्याचबरोबर हिमालयीन अस्वलं, आॅटर, करडं मुंगूस, बिबटे, फिशिंग कॅट अशा अनेक प्रजाती आढळतात. हौशी पक्षीनिरीक्षकांसाठीही अत्यंत योग्य ठिकाण. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होऊन जूनपर्यंत हे पार्कखुलं राहतं. पण वाघ पाहण्यासाठी जायचं असेल तर मार्च ते मे महिना परफेक्ट!

3.गीर अभयारण्य- गुजरातला भेट द्यायची आणि गीरला जायचं नाही असं होऊच शकत नाही. आशियाई सिंह आढळणारं हे भारतातलं एकमेव ठिकाणं. पण सिंहाशिवाय इथे 32 वेगवेगळ्या जातींचे सस्तन प्राणी, 300 प्रकारच्या जातीचे पक्षी आढळतात. आॅक्टोबरपासून मेपर्यंत केव्हाही या अभयारण्याला भेट देता येते.

4.काझीरंगा अभयारण्य- काझीरंगा म्हटलं की चटकन डोळ्यासमोर येतो एकशिंगी गेंडा. जवळपास 400 एकरांच्या परिसरात वसलेल्या या अभयारण्यामध्ये एकशिंगी गेंड्यांची जगातली सगळ्यात जास्त संख्या आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या सान्निध्यात वसलेल्या या अभयारण्यामध्ये रानगवा, हत्ती, आॅटर, अस्वलं, बारसिंगा असे इतरही प्राणी आढळतात. शिवाय अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ पक्षांसाठीही काझीरंगा प्रसिद्ध आहे. इथल्या जैवविविधतेमुळेच काझीरंगाचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीतही केला गेला आहे.

5.भरतपूर पक्षी अभयारण्य- केवलादेव-घाना राष्ट्रीय पक्षी उद्यान भरतपूर पक्षी अभयारण्य नावानेच प्रसिद्ध आहे. हे देशातलं सर्वांत मोठं पक्षी अभयारण्य आहे. इथे पक्ष्यांच्या 300हून अधिक प्रजाती आहेत. स्थलांतरित पक्षी त्यातही सायबेरियन क्र ौंच आणि मध्य आशियातून येणाऱ्या प्रजाती हे इथे येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं. स्थलांतरित पक्षांचा इथे येण्याचा काळ हा मुख्यत: हिवाळा असतो. त्यामुळे आॅक्टोबरपासून इथला टूरिस्ट सीझन सुरु होतो.

6. सुंदरबन नॅशनल पार्क- सुंदरबन हा जगातला सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश. गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात वसलेलं हे अभयारण्य इथल्या खारफुटीच्या जंगलासाठी आणि वाघांसाठी ओळखलं जातं. मॉनिटर लिझार्ड, खाडीमधल्या मगरी, आॅलिव्ह रिडले जातीची कासवं...असं बरंच काही इथं पाहण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच सुंदरबन हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीमध्ये देखील आहे. इथल्या हवामानामुळे हे पार्क वर्षभर खुलंच असतं. पण जर तुम्हाला वाघांचं आकर्षण असेल तर मात्र आॅक्टोबर ते एप्रिल हा उत्तम काळ आहे.

7. पेरियार अभयारण्य- केरळमधलं हे अभयारण्य टायगर रिझर्व्ह असलं तरी इथलं मुख्य आकर्षण म्हणजे हत्ती. गोल्डन लंगूर, कॉमन लंगूर, निलगिरी लंगूर, नीलगिरी तहर या खास पश्चिम घाटातील ठराविक जंगलात आढळणाऱ्या प्रजाती हे पेरियारचं वैशिष्ट्य. पेरियार लेकच्या नावावरु न अभयारण्याला हे नाव मिळालं, तोही पर्यटकांनी गजबजलेला असतो. आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या पार्कला तुम्ही जूनपर्यंत कधीही भेट देऊ शकता. याशिवायही ताडोबा-अंधारी, रणथंबोर, बांधवगड. मानस अशी अनेक नॅशनल पार्कतसेच अभयारण्य भारतात आहेत, जी तुम्हाला त्या त्या जागेचा एक युनिक फील देऊ शकतात. या ठिकाणांना भेटी देण्यासाठी अवघा दोन महिन्यांचा काळ शिल्लक आहे, त्यामुळे फार उशीर करु नका!