समुद्राच्या मधोमध बांधला आहे हा पांबन पूल, घ्या रोमांचक प्रवासाचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 11:40 AM2018-06-06T11:40:19+5:302018-06-06T11:40:19+5:30

तसं तर या पुलाला भारतातील सर्वात धोकादायक पूल मानलं जातं पण या पुलावरुन प्रवास केल्यास हा प्रवास आयुष्यभरासाठी तुमच्या स्मरणात राहील. 

Travel Madurai to Rameshwaram by Pamban bridge in the middle of sea | समुद्राच्या मधोमध बांधला आहे हा पांबन पूल, घ्या रोमांचक प्रवासाचा अनुभव!

समुद्राच्या मधोमध बांधला आहे हा पांबन पूल, घ्या रोमांचक प्रवासाचा अनुभव!

googlenewsNext

सकाळची वेळ, तुमच्या दोन्ही बाजूंनी समुद्राच्या खवळणाऱ्या लाटा, वेगवान हवा आणि 30 च्या स्पीडने चालणारी तुमची ट्रेन. असा रोमांचक प्रवास कदाचितच कुणी केला असेल. पण मन्नार ते रामेश्वरम दरम्यान लागणारा हा पांबन पूलवरील प्रवास कोणत्याही अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाहीये. तसं तर या पुलाला भारतातील सर्वात धोकादायक पूल मानलं जातं पण या पुलावरुन प्रवास केल्यास हा प्रवास आयुष्यभरासाठी तुमच्या स्मरणात राहील. 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक रामेश्वरम

पांबन पूल हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. मन्नारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी ह्या हिंदी महासागराच्या उपसमुद्रावर बांधला गेलेला ६,७७६ फूट लांबीचा हा पूल रामेश्वरम द्वीपाला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो. 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम गावामध्ये फक्त ह्या पुलाद्वारेच प्रवेश शक्य आहे. वास्तविकपणे येथे रेल्वेवाहतूकीसाठी एक व मोटार वाहतूकीसाठी एक असे दोन वेगळे पूल अस्तित्वात असून दोन्ही पुलांना एकत्रितपणे पांबन पूल असेच म्हटले जाते.

भारतातील पहिला सर्वात मोठा सागरी पूल

२४ फेब्रुवारी १९१४ मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पांबन रेल्वे पूल भारतामधील सर्वात पहिला सागरी पूल आहे व मुंबईमधील वांद्रे-वरळी सागरी महामार्ग बांधून पूर्ण होण्याअगोदर देशातील सर्वात लांब सागरी पूल होता. ह्या जुन्या पुलाच्या शेजारी १९८८ साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर धावतो.

100 वर्ष जुना पूल

पांबन पुलांचं बांधकाम ब्रिटीश रेल्वेने 1885 मध्ये सुरु केले होते. तर 1914 मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. म्हणजे हा पूल आता 100 वर्षांपेक्षा जास्त जूना झाला आहे. पण अजूनही या पुलाचं बांधकाम मजबूत आहे. 

का सुरु केला होता हा पूल?

१९१४ ते १९६४ सालापर्यंत चेन्नईच्या इग्मोर स्थानकापासून रामेश्वरम बेटाच्या धनुषकोडी ह्या गावापर्यंत मीटर गेज रेल्वे धावत असे. १९६४ सालच्या एका प्रलयंकारी चक्रीवादळामध्ये धनुषकोडी गाव पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर रेल्वेसेवा रामेश्वरमपर्यंतच चालवण्यात येते. 
 

Web Title: Travel Madurai to Rameshwaram by Pamban bridge in the middle of sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.